समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच ;मायलेकीसह एक जण ठार; एक गंभीर
जालना- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होतच आहे .आज शुक्रवार दिनांक 9 रोजी जालना शहरापासून जवळच असलेल्या निधोना येथे एका इको गाडीला झालेल्या अपघातात नागपूर येथील मायलेकी आणि अन्य एक जण जागीच ठार झाले आहेत, तर एक तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे.
नागपूर येथे जगनाडे चौक, गल्ली नंबर दोन, सेवन स्टार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या मायलेकी आई मालुबाई पुरी आणि मुलगी शांताबाई पुरी या दोघी काल सायंकाळी अहमदनगर येथे धार्मिक विधी करण्यासाठी रामोजी शिवराज तिजारे यांचे वाहन क्रमांक इको एम एच 49 बी डब्ल्यू 0615 घेऊन नगरला गेले होते आणि आज तो विधी पूर्ण करून नागपूरकडे परत जात होते. दरम्यान दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधोना येथे त्यांचे वाहन दुभाजकावर धडकले आणि यामध्ये रामोजी शिवराज तिजारे वय 50 मालुबाई पुरी वय 70 आणि शांताबाई पुरी वय 45 हे तिघेजण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान रामोजी तिजारे यांचा मुलगा सुरज तिजारे वय 30 याच्यावर सध्या सामान्य रुग्णालयात जालना येथे उपचार सुरू आहेत ते नागपूर येथे नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर एक मध्ये राहत होते.
तर मायलेकी या दोघेही एकच ठिकाणी राहत होत्या, त्यांच्या पश्चात परिवार नसल्याचे समजते. दरम्यान अपघाताची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस संजय अजगर आणि रुग्णवाहिकेचे डॉ. सुनील वाघ, वाहन चालक आनंद भोरे, गणेश चव्हाण, कृष्णा नागरे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी आणि मृतांना सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. त्यांच्यावर डॉ. संतोष राऊत डॉ. राजेश्वरी वागतकर, परिचारिका किरण पवार, स्नेहल साळवे, वैभव गिराम, महेश शिंदे, सचिन हिवाळे यांनी तातडीने उपचार केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com