सावध रहा!पुढील तीन दिवसांसाठी “येलो अलर्ट” जारी
मुंबई -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जालना जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक दहा ते बारा असे तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .हवामानशास्त्र केंद्र कुलाबा यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वादळे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिनांक 13 रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याला अनुसरून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षेसाठी काही उपाय योजना सुचविल्या आहेत .
अशी घ्या काळजी* मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये.* गडगडाटाच्या वादळा दरम्यान व विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.* ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, यांच्यापासून दूर राहावे .* मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स ,ध्वजाचे खांब ,विद्युत खांब ,धातूचे कुंपण अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये.* विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.* शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा* जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.* आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळच्या तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना, येथील दूरध्वनी क्रमांक 024 82- 223132 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com