Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“समृद्धी” वर अपघातात “वृद्धी” ;आज पुन्हा अपघात, एक जण ठार

जालना- समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातामध्ये वृद्धीच होत आहे. काल दिनांक 9 रोजी एका अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिनांक 10 रोजी पुन्हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास एक अपघात झाला. या अपघातामध्ये बेंगलोर येथील माहिती व तंत्रज्ञान कंपनीत काम करणारी तरुणी ठार झाली आहे. ही तरुणी आणि नागपूर येथील तरुण असे दोघेमित्र मिळून फिरण्यासाठी पुण्याकडे गेले होते आणि आज ते परत नागपूरला जात होते .

नागपूर येथे प्रेम नगर इतवारा भागात राहणारा अंशुल राजू टाकळीक वय पंचवीस वर्ष आणि बेंगलोर येथे हुपडी जिल्ह्यात उठापरा येथे राहणारी तरुणी ओइंद्रीला सुमित रॉय  वय 26,हे दोघे एकाच कंपनीत (इन्फोसिस) कार्यरत होते.  ओइंद्रीला रॉय बेंगलोर हून नागपूरला आली आणि नागपूरहून अंशुल सोबत फिरण्यासाठी पुण्याकडे गेले. काल दिनांक नऊ रोजी रात्री आठ वाजता हे दोघे पुणे येथून टाटा टिगोर गाडी क्रमांक एम.एच.49 बी डब्ल्यू 0117 गाडीने नागपूरकडे जात होते .उद्या दिनांक 11 रोजी मैत्रीण नागपूरहून विमानाने बेंगलोरला जाणार होती. दरम्यान आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 357 ,धार -कडवंची जवळ रस्त्याच्या कडेने जात असलेल्या एका ट्रकला पाठीमागून अंशुलच्या टिगोर गाडीने ठोस दिली. यामध्ये ओवींद्रीला ही जागीच ठार झाली आहे ,तर अंशुल किरकोळ जखमी झाला आहे .या दोघांनाही जालना येथील शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.रुग्णवाहिकेचे डॉ. सुनील वाघ, वाहन चालक आनंद भोरे, गणेश चव्हाण, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुग्णांना सामान्य रुग्णालयात आणले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button