वय वर्ष 24; व्यवसाय हिवरा (राळा)येथे बोगस डॉक्टरकी
जालना- जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यासंदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मागील महिनाभरात अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू होती आणि ते बोगस असल्याची खात्री करणे ही सुरू होते. त्यातूनच बदनापूर तालुक्यातील मौजे हिवरा(राळा) येथे एक 24 वर्षाचा बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार या पथकाने काल दिनांक नऊ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मौजे हिवरा(राळा) येथे या बोगस डॉक्टरच्या घरावर छापा मारून त्याला अटक केली आहे. सुमन कैलास विश्वास वय 24 वर्ष राहणार बोरगाव जिल्हा उत्तरचोबिस, परगाना (पश्चिम बंगाल) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
बदनापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश विनायकराव सोळंके यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरिष्ठांच्या आदेशानुसार बोगस डॉक्टरांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहेत .त्यानुसार दिनांक 9 जून रोजी बोगस डॉक्टर समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड ,आरोग्य सहाय्यक सुदेश वाठोरे, डॉ. विशाल सोळुंके वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव, यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात येऊन या बोगस डॉक्टरवर छापा टाकण्याची सविस्तर माहिती दिली .त्या अनुषंगाने पोलिसांनी या भागाचे बीड अंमलदार श्री. बहुरे, पंच म्हणून श्रीमती एस.के.अष्टीकर ग्रामसेविका हिवराळा व ग्रामपंचायत हिवराळा येथील संगणक परिचारक शिवाजी जनार्दन मडके यांना घेऊन दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिवरा (राळा) या गावात पोहोचले .खाजगी वाहन घेऊन गेल्यामुळे हे वाहन इतर ठिकाणी उभे केले आणि श्रीराम नारायण मडके यांच्या घरात राहणाऱ्या या बोगस डॉक्टरची तपासणी करण्यासाठी सर्वजण त्याच्या खोलीकडे गेले .त्यावेळी खोलीला आत मधून कडी लावलेली होती. कडी वाजवल्यानंतर या बोगस डॉक्टरने दार उघडले त्यावेळी त्याला घेराव घालून सर्वांची ओळख करून दिल्यानंतर त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी असलेले प्रमाणपत्र आणि इतर परवानगी आहे का? असे विचारले असता त्याने कोणतेही प्रमाणपत्र दाखविले नाही. त्यामुळे त्याच्या खोलीची झडती घेतली असता विविध कंपन्यांची औषधे, इंजेक्शन आणि अन्य वैद्यकीय साहित्य सापडले ,आणि ते पंचा समक्ष जप्त केले आहे. त्यानंतर चंदंनजिरा पोलीस ठाण्यात येऊन कोणतेही वैद्यकीय क्षेत्राची पदवी अथवा प्रशिक्षण न घेता स्वतः डॉक्टर असल्याचे भासून हिवरा (राळा) येथील व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांवर उपचार करीत असताना व रुग्णांसाठी लागणारे औषध, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीने जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बाळगत असताना मिळून आला .त्यामुळे बोगस बंगाली डॉक्टर सुमन विश्वास याच्याविरुद्ध भादवि कलम 420 अन्वये, वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुण येतो का?असे बोगस डॉक्टर कमी खर्चात उपचार करतात,आणिआवश्यकतेपेक्षा पेक्षा जास्त क्षमतेच्या औषधींचा वापर करतात ,त्यामुळे रुग्णाला तात्पुरता फरक पडतो .परंतु अनावश्यक औषधीचा वापर झाल्यामुळे त्याचे कांही दिवसांनी दुष्परिणाम दिसायला लागतात.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com