मेगा भरती;जि.प.अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 412 पदांची भरती
जालना -महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांसाठी तब्बल 412 पदांची भरती होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी( ग्रामीण) यांच्या अधिनस्त रिक्त मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास-2022 दिनांक 2 फेब्रुवारी 2023 नुसार व आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र क्र. अंगणवाडी कर्मचारी भरती 2023-24 दिनांक 27-4-2023 तसेच शासन निर्णय क्रमांक 94 दिनांक 2 मे 2023 च्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया तालुका निहाय पूर्ण करण्यात येणार आहे.
उमेदवारासाठी या आहेत पात्रता. या प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असलेल्या शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्पाच्या क्षेत्राबाहेल उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील व त्याबाबत त्यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार केल्या जाणार नाही. दिनांक 4 जुलै 2023 पर्यंत उमेदवार आपले अर्ज करू शकतील. बारावी उत्तीर्ण आणि 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली असून लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या संदर्भातील विहित नमुन्याचा अर्ज त्या- त्या ठिकाणच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सोमवार दिनांक 19 पासून उपलब्ध होणार आहेत.
निवड पद्धत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारीच ही सर्व प्रक्रिया पार पाडणार आहेत. परंतु ती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी यासाठी दुसऱ्या तालुक्यातील समिती या प्रक्रियेची पडताळणी करणार आहे.असे असेल मानधन मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शासनाने मानधनही ठरवलेले आहे. त्यानुसार मिनी अंगणवाडी सेविकेसाठी सुमारे 7200 तर मदतनीस सेवीकेसाठी पाच हजार पाचशे रुपयांचे मानधन दिल्या जाण्याची शक्यता आहे.
या आहेत रिक्त जागा जालना-1 मदतनीस 17, घनसावंगी- मिनी सेविका तीन मदतनीस 47, जालना-2मिनी सेविका दोन मदतनीस बावीस, परतुर-मदतनीस 26, बदनापूर-मिनी सेविका तीन मदतनीस बावीस, मंठा-मिनी सेविका दोन मदतनीस सत्तावीस, अंबड-मिनी सेविका चार मदतीने 42, भोकरदन-मिनी सेविका एक मदतनीस 25, अंबड-2 मिनी सेविका एक मदतनीस 25,भोकरदन-2मदतनिस 17, घनसावंगी मिनी सेविका दोन मदतनीस 42,जाफराबाद- मदतनीस 82 अशा एकूण 412 महिलांची भरती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत केली जाणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com