रुग्णांच्या हक्कासंदर्भात जनजागृती अभियान
जालना -रुग्णांना असलेले हक्क कोणते ?आणि कसे आहेत आणि त्या बद्दल सरकार काय करत आहे .याविषयीची जनजागृती करण्यासाठी एम.पी. जे. म्हणजेच मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर जालना .या संघटनेने गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांचे हक्क हे अभियान दिनांक एक ते 15 जून चालवले आहे. या अभियानांतर्गत शासन रुग्णांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे .तसेच रुग्णांच्या गोपनीयतेचा ,महिला रुग्णांची तपासणी करताना सोबत महिला कर्मचारी उपस्थित असणे ,रुग्णाला इस्पितळात भरती करण्यापूर्वी त्याच्याकडून घेतल्या जाणारी आगाऊ रक्कम या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. शासनाने रुग्णांच्या हक्कांची पायमल्ली करू नये अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com