किरायादारनीने दिला आवाज; समोर पाहिले तर चोरटे,मध्यरात्रीच्या थरार.
जालना -घरातील इतर सदस्य आणि किरायदार गच्चीवर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरमाणकिनीला मारहाण करून सुमारे दीड लाख रुपयांचा आवाज लुटून नेल्याची घटना मध्यरात्री घडली.मोकळ्या परिसरात हे घर असतानाही हा प्रकार घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे किरायदार महिलेने आवाज दिल्यानंतर घर मालकीणने दार उघडल्यावर समोरच चोरटे दिसले आणि पुन्हा दार लावण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे चोरट्यांनी घरमालकिनीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. आणि इतर सदस्यांना चाकूचा धाक दाखवून घरातील ऐवजाची लूट केली आहे.
शहरातील दूरदर्शन केंद्रासमोर म्हाडा कॉलनी आहे या कॉलनीतच मोकळ्या परिसरात प्रकाश सुपारकर यांचे घर आहे. प्रकाश सुपारकर यांची पत्नी सावित्री सुपारकर या आणि त्यांची मुलगी घरामध्ये झोपलेले होते, रात्री त्यांचे किरायदार आणि इतर सदस्य घराच्या गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सुपारकर यांच्या किरायादारनीने दार वाजवून सावित्री सुपारकर यांना आवाज दिला .आवाज दिल्यानंतर दार उघडताच समोर चार-पाच चोरटे दिसले त्यामुळे सावित्रीबाई यांनी पुन्हा दार लावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि घरात प्रवेश केला. घरामध्ये सर्वसामान कपाट, लोखंडी संदुक, महालक्ष्मीचे साहित्य उचकटून टाकून 73 हजार रुपये रोख आणि इतर सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com