आयटीआयच्या जागेवरील “ते” अतिक्रमण काढले
जालना -औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर केलेले अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने आज पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कासित केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय च्या ताब्यात असलेल्या या जागे संदर्भात काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात गायकवाड परिवाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत हे उपोषण सोडवले होते. त्यामुळे शासनाच्या या जागेवर अतिक्रमण झाले. दरम्यान हा लढा न्यायालयात सुरूच होता. न्यायालयाने नगरपालिकेला शासनाच्या जागेवरील हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 16 रोजी नगरपालिकेचा फौज फाटा सकाळीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाला. त्यांच्या बंदोबस्ताला चंदंनझीरा पोलीसही देण्यात आले आणि गायकवाड परिवाराने केलेले अतिक्रमण नेस्तनाबूत करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com दिलीप पोहनेरकर 942221972