1.
Jalna Districtजालना जिल्हा

रस्त्यावर लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांकडून गावठी पिस्टल जप्त

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात रस्त्यावर लूटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल ही जप्त केले आहे.

जाफराबाद तालुक्यातील सातेफळ जवळ रस्ता खराब आहे. त्यामुळे या भागात वाहनांना कमी गतीने जावे लागते .याचा फायदा घेत जाफराबाद तालुक्यातील सातेफळ इथे राहणारा अंकुश तेजराव खंदारे वय 35, आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई येथे राहणारा संदीप गणेश वाघमारे वय 30 या दोघांनी वाटसरूंना अडवून लुटण्याचा बेत आखला. ही माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना मिळाली. त्या अनुषंगाने काल दिनांक 15 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्री.ठाकरे यांनी या सातेफळ येथे रस्त्यावर पुलाजवळ दबा धरून बसलेल्या अंकुश खंदारे आणि संदीप वाघमारे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक लोखंडी कटर, आणि चोरीची आणलेली एक हिरो होंडा कंपनीची दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान मागील वर्षी देखील याच ठिकाणी एक लाख रुपयांची रोकड पळविण्यात आली होती. त्यामध्ये पाच आरोपी होते. त्यापैकीच अंकुश तेजराव खंदारे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. हा सापळा रचण्यासाठी प्रभारी पोलीस अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, कर्मचारी दिनकर चंदनशिवे, त्र्यंबक सातपुते, गजेंद्र भुतेकर, सचिन तिडके आदी कर्मचाऱ्यांनी मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे हे करीत आहेत.

अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com दिलीप पोहनेरकर 942221972

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button