आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन-ABHA CARD
जालना- आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा(ABHA). शासनाच्या या नवीन आरोग्य प्रणालीमुळे आता प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वारंवार आपल्याला कागदपत्र साठवण्याची गरज पडणार नाही. यासाठी कोणताही खर्च सामान्य नागरिकाला लागणार नाही, मात्र घरी आलेल्या अशा स्वयंसेविका आणि आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देणे क्रमप्राप्त आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांसाठी असलेल्या या योजनेचा फायदा सर्वांनाच होईल. केवळ शासकीय इस्पितळामध्येच नव्हे तर खाजगी इस्पितळांमध्ये देखील याचा वापर फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता हे कार्ड काढणे स्वतःच्या हिताचे ठरणारे आहे. हे कार्ड काढण्यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेमध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारीश्रीमती डॉ.हिराणी आणि डॉ. गजानन मस्के यांच्या उपस्थितीत नगरपालिका, नगरपंचायत, आशा स्वयंसेविका यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा पार पडली.
या कार्डमुळे आपल्याला असलेला आजार, यापूर्वी आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले? कोणती औषधी घेतली? किती हॉस्पिटल बदलले? ही सर्व माहिती यामध्ये डिजिटल पद्धतीने असणार आहे. जसे की एखादा बँकेचे अकाउंट असते, किती पैसे आले? कोणाला दिले कोणी? काढले किती? कधी काढले? हे ट्रांजेक्शन जसे आपण पाहू शकतो तशाच पद्धतीने हे कार्ड आपल्याजवळ असल्यानंतर आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन डॉक्टरांना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्यावर उपचार करण्यासाठी योग्य औषधी दिल्या जाईल.
https://healthid.ndhm.gov.in/register
आपला हेल्थ आयडी काढण्यासाठी वरील केंद्र सरकारच्या लिंक वर क्लिक करावे. आवश्यक ती माहिती भरून आपण स्वतः आपला आयडी काढू शकता…तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राने किंवा रुग्णालयाने आपल्या Data Entry operator यांच्या मदतीने आपल्या केंद्रात येणाऱ्या सर्व रुग्ण व त्यांच्या सोबत येणाऱ्या नातलागांचा ABHA ID काढून द्यावा व प्रत्येक स्तरावर ABHA ID बाबत सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कडे विविध आरोग्य सेवा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पेशन्टना व नागरिकांना या बाबत विचारणा करावी व त्यांनी तो काढला नसल्यास काढून द्यावा. यासंदर्भात काही अडचण आल्यास शासनाच्या 144744 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972