मामा भाच्याच्या मारहाणीत चुलतीचा खून!
परतूर-जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा भाच्याने केलेल्या हाणामारीमध्ये चुलतीचा खून झाल्याची घटना आज दिनांक 20 रोजी सकाळी परतूर जवळील आंबा येथे घडली.
परतूर तालुक्यातील आंबा येथे सुखदेव माणिक जाधव वय 55 वर्ष राहणार गवळी गल्ली, यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे .ते आपल्या परिवारासह इथे राहतात. घरी दोन शेळ्या आणि चार म्हशी आहेत .बाजूच्या गल्लीमध्ये सुखदेव जाधव यांचे दोन भाऊ पांडुरंग आणि मुगाजी हे राहतात. सुखदेव जाधव हे रोज परतुर येथे दूध दही नेऊन विक्रीचा व्यवसाय करतात. रोजच्या प्रमाणेच आज ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास म्हशीचे दूध काढत असताना त्यांच्या पुतण्या कैलास उर्फ पिंट्या मुंगाजी जाधव तिथे आलाआणि बोकड बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी गावातल्या लोकांनी ही भांडणे सोडवली आणि रोजच्या प्रमाणे पुन्हा कामकाज सुरू झाले. सुखदेव जाधव आणि त्यांची पत्नी मंगला जाधव हे दोघे दुध दही विक्री करण्यासाठी परतूर येथे गेले. परत येताना 11 वाजेच्या सुमारास सुखदेव जाधव यांनी शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या मुलीला सोबत घेऊन घराकडे आले. घरी आल्यानंतर कैलास जाधव आणि त्याचा मामा बंडू सिद्धू आप्पा इकलवारे राहणार आष्टी हे दोघे सुखदेव जाधव यांच्याकडे आले. बंडू याने ,माझ्या भाच्याला का शिवीगाळ केली ?,असे म्हणत लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या या मारहाणीमुळे सुखदेव जाधव हे घरातून पळून तळ्याकडे गेले .त्याच वेळी परतुर कडून त्यांची पत्नी घराकडे येत असताना दिसली .त्यावेळी आंबा गावाजवळ कैलास मुगाजी जाधव आणि त्याचा मामा बंडू सिद्धू आप्पा इकलवारे या दोघांनी मंगलबाईला लाकडी दांड्याने मारहाण केली या मारहाणी मध्ये मंगलाबाई सुखदेव जाधव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच परतूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बुधवंत आणि पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कैलास मुगाची जाधव याला अटक केली आहे तर बंडू एकलवारे याचा पोलीस शोध घेत आहेत.सुखदेव माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतुर पोलिसांनी भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972