सामाजिक संस्थांच्या कामांतून शाश्वत उपलब्धत;डॉ.विजय राठोड;लॉयन्स तर्फे थाडेश्वर बारवेचे सुशोभीकरण
जालना- दातृत्वाच्या बाबतीत जालनेकरांचे हृदय हे मोठे आहे. येथील सामाजिक संस्था जी कामे करतात ती केवळ दिखावा,प्रसिध्दीसाठी नव्हे तर मना-भावातून करतात. येथील सामाजिक संस्थांच्या कार्याची शाश्वत उपलब्धता दिसून येते असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज काढले.
लॉयन्स क्लब प्रांत थ्री.टू.थ्री.फोर.एच.टू.च्या वतीने थाडेश्वर महादेव मंदिर परिसरातील बारवामधील ( बंदर बावडी) गाळ काढून दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे उद्घाटन शुक्रवारी ( ता.30) जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड आणि प्रांतपाल लॉ.पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उद्योजक कमल झुनझुनवाला, सुनील रायठठ्ठा, प्रविण झंवर, विशाल बनवट,विजयकुमार कामड, लॉयन्सचे प्रांत प्रशासकीय प्रमुख अग्र विभूषण लॉ. सुभाषचंद्र देविदान, प्रांत सचिव लॉ. अरुण मित्तल, कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड, विभागीय अध्यक्ष लॉ. सुनील बियाणी, प्रकल्प प्रमुख तथा गॅट समन्वयक अतुल लढ्ढा,प्रभाग अध्यक्ष लॉ. सुशील पाण्डेय, लॉ. सुयोग कुलकर्णी, लॉ. ॲ़ड. भरत मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कुंडलिका – सीना नद्यांचे सुशोभीकरण, खोलीकरण, पारसी टेकडी, अशी शाश्वत कामे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिसून येतात. असे नमूद करत शहरातील बारवांच्या सुशोभीकरणातही सामाजिक संस्था पुढाकार घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्या माध्यमातून शहराच्या सुशोभीकरणात अधिक भर पडेल असा विश्वास डॉ.विजय राठोड यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी अवघ्या आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार आणि प्रांतपालांच्या मार्गदर्शनाखाली बारवेचा गाळ काढून सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती दिली. लॉ. अतुल लढ्ढा यांनी आभार मानले. या वेळी माजी प्रांतपाल लॉ. विजय बगडिया, राजेश भूतिया,डॉ. गिरीश पाकणीकर, राजेश लुणिया, जगदीश मुंदडा, जगदीश मिश्रा, नरेंद्र मोदी, विजय दाड,अशोक हुरगट, रामकुँवर गुप्ता, रामकुँवर अग्रवाल, राजेश पित्ती, द्वारकादास मुंदडा, डॉ. मनिष अग्रवाल, बालाजी बांडे, लक्ष्मण कंकाळ, जयश्री लढ्ढा,गजानन सारस्वत, जगन्नाथ शिंदे, आदींची उपस्थिती होती.
मानवता आणि समाज केंद्रबिंदू मानून लॉयन्स, रोटरी संस्था कार्यरत असतात, प्रशासनाची सुद्धा वेळोवेळी मदत मिळते. तथापि प्रांतपाल म्हणून लॉयन्स सारख्या अंतरराष्ट्रीय संस्थेत समाजसेवेचे वैश्विक कार्य करतांना मर्यादा येतात तेव्हा आपल्याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. अशा भावना प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. प्रशासनाच्या सहकार्याने समाज उपयोगी उपक्रम सुरू राहतील असा विश्वास ही लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी शेवटी व्यक्त केला.
अधिक बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172