स्पोर्ट्स बाईक वर मोबाईलचोरांची टोळी; आठ तासात आरोपी गजाड
जालना-स्पोर्ट्स बाईकवर स्टाईल मध्ये उभे राहून रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्याला लुटणाऱ्या मोबाईल चोरांच्या टोळीला स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गजाआड केले आहे, आणि त्यांच्याकडून मोबाईलही जप्त केले आहेत.
संतोष मुक्ताराम बोबडे हे दिनांक एक जुलै रोजी जुना मोंढा भागात असलेल्या परिवार शाखेच्या पाठीमागून जात असताना पांढऱ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईक वरून तीन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी जबरदस्तीने बोबडे यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला .त्या नंतर ते पळून गेले. या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही चोरी सुंदर नगर भागात राहत असलेल्या विजय अनिल थोरात यांनी केले असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून सुंदर नगर, चंदन झिरा परिसरामध्ये होंडा कंपनीच्या होर्नेट स्पोर्ट्स बाईकवर विजय अनिल थोरात हा सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्याने त्याचे नाव विजय उर्फ सोनू अनिल थोरात वय 22 वर्ष असे सांगितले आणि स्वतःच्या फायद्यासाठी विशाल शिवाजी मिश्रा वय 21 राहणार सुंदर नगर आणि राजू देविदास ढेंबरे व 25 राहणार मारुती मंदिराजवळ सुंदर नगर यांच्या मदतीने ही चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात आणून पोलीस खाक्या दाखवताच त्याने औद्योगिक परिसरामध्ये दिनांक एक रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ओम साईराम कंपनी समोरून पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्याच्याकडून एक अँड्रॉइड मोबाईल पळविला असल्याचेही कबुली दिली आहे. दोन आरोपींकडून स्पोर्ट्स बाईक सह दोन मोबाईल असा ऐकून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आशिष खांडेकर ,प्रमोद बोंडले, सॅम्युएल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे ,कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172