श्रीराम मंदिर संस्थांनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
जालना- आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर गुरूंची आवश्यकता असते. या गुरुंच्याप्रति असलेली आपली श्रद्धा आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सोमवारी हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
जालना शहरातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थापित श्रीराम संस्थान आनंदवाडी येथे देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून इथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेपासूनच सद्गुरु भक्त श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या पादुकांना ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चाराच्या जयघोषात दुग्धाभिषेक केला. संस्थांनचे विश्वस्त कल्याण महाराज आचार्य यांनी आपली किर्तन सेवा अर्पण केली. महाप्रसादाने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा सांगता झाली.
ताज्या बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172