1.
Jalna Districtजालना जिल्हा

आता बोला! पोलीस मित्रच पिण्याचे पाणी आणि घराचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटायचा महिलांना

जालना -महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मनी गंठण चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती .या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा  शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी अंबड चौफुली जवळ वळण रस्त्यावर सापळा लावला. या सापळ्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वरून जात असलेल्या अमर चुलुबाळ कांबळे व 29 वर्ष , आणि त्याचा सहकारी फिरोज उर्फ लखन अजित शेख व तीस वर्षे  दोघे राहणार नेवासा फाटा. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे अमर चिलूबाळ कांबळे हा नेवासा पोलीस ठाणे अंतर्गत 2013 -14 मध्ये पोलीस मित्र म्हणून कार्यरत होता.

या दोघांनी आज सकाळी शिक्षक कॉलनी व काल वसुंधरा नगर जालना येथे तसेच मे महिन्यात म्हाडा कॉलनी येथील महिलांना एकटे पाहून पिण्याचे पाणी मागण्याचे तसेच पत्ता विचारण्याचा बहाना करून गळ्यातील मनी गंठण आणि साखळी चैन बळजबरीने चोरी केली असल्याचे कबुली दिली आहे. तसेच त्यांच्या सोबत असलेली मोटरसायकल देखील पोलीस ठाणे लोणीकंद, पुणे शहर हद्दीतील वाघोली परिसरातून चोरी केली आहे .या आरोपींकडून महिलांचे दागिने मोबाईल धारदार शस्त्र असा एकूण एक लाख 82 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.

2) स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या दुसऱ्या कारवाईच्या प्रकरणांमध्ये कैलास राठोड राहणार गंगाराम तांडा अंबड ,याने दिनांक 4 जुलै रोजी अंबड येथील चैतन्य हॉस्पिटल जवळून पार्किंग मध्ये उभी असलेली एक सीबीझेड मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ही मोटरसायकल जालना येथील त्याचा चुलत भाऊ नवनाथ रघुनाथ राठोड याच्या घराशेजारी लावली असल्याचे सांगितले. या मोटरसायकल सोबतच दोन महिन्यांपूर्वी समर्थ साखर कारखाना अंकुश नगर येथून एक एचएफ डीलक्स मोटरसायकल सह इतर वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून एक लाख वीस हजारांच्या चार मोटार सायकल जप्त केल्या आहेत . ही सर्व कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे ,सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, बबन पोहरे, सुधीर वाघमारे, कैलास चेके ,देविदास भोजने आदि कर्मचाऱ्यांनी केली.

ताज्या बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button