जालन्याच्या पोलिसांचा डंका; नऊ सुवर्ण आणि पाच रजत पदक मिळवत नैपुण्य, कौशल्य, आणि गुणवत्तेमध्ये विभागात प्रथम
छत्रपती संभाजी नगर -पोलीसांची व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता, दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने दिनांक 3 ते5 जुलै या कालावधीत डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली 18वा औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण येथील गोकुळ पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक,सुनिल कृष्णा लांजेवार,अपर पोलीस अधीक्षक,महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर,प्रकाश चौगुले, पोलीस उप अधीक्षक (गृह), यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक कार्यालये, औरंगाबाद ग्रामीण, जालना,बिड, उस्मानाबाद येथील एकुण 80 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या पुढील स्पर्धेतील श्रेणी ज्यात 1) शास्त्रशुध्द पध्दतीने तपास(फुटप्रिंट कास्टिंग, पुरावे लेबलिंग, पॅकिंग,मोडिको-लिगल) 2)पोलीस छायाचित्रण (फोटेग्राफी) 3)दृकश्राव्य चित्रण (व्हिडीओग्राफी) 4)घातपात विरोधी तपासणी 5) संगणक कौशल्य क्षमता 6) श्वान क्षमता चाचणी आदी विविध विषयावर स्पर्धकांना सामोरे जावे लागते. त्याबरोबर लेखी व तोंडी परीक्षे बरोबरच प्रात्याक्षित परिक्षा ही घेण्यात येवुन वस्तुनिष्ठ मुल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परिक्षण करण्यात येते. त्याच प्रमाणे स्पर्धाकांचे गुन्हे तपासाचे कौशल्य तपासण्यासाठी त्यांना डमी गुन्हयाचे टास्क देण्यात आले ज्यात त्यांना कमीत कमी वेळेत अत्यंत कौशल्य पुर्ण तपास करण्यासाठी स्पर्धकांनी स्वत:चे कसब लावले.
यावेळी डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र यांचे हस्ते सर्व विजेत्यांना पदक व प्रशंसापत्र देवुन गौरवण्यात आले आहे. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, “पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आधुनिकरणाची कास धरून नविन तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, किचकट व जटील स्वरूपाच्या गुन्हयाची उकल करतांना नविन तंत्रज्ञानाचा वापर करून ते लवकरात लवकर उघड होण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्तीने कायम शिक्षण आत्मसात करण्याची प्रक्रिया चालु ठेवावी. शिक्षण घेतांना वयाचे कोणतेही बंधन नसते. यामुळे स्वत:ला वेळोवेळी अपग्रेड करत राहणे अत्यावश्यक आहे. असे म्हणुन सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राज्यस्तरावरिल कर्तव्य मेळाव्यात सुध्दा उत्तम कामगिरी करत पदक प्राप्त करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.”
विजेते श्रेणी नुसार अ) शास्त्रशुध्द कौशल्ययुक्त तपास श्रेणीत 1) न्यायवैद्यक शास्त्र लेखी परिक्षा, गुन्हे तपास,फौजदारी कायद्याचे कलम,प्रक्रिया व न्यायालयीन निर्णय, लेबलिंग, पॅकिंग यात सुवर्ण पदक हे स.पो.नि. शांतीलाल चव्हाण, उस्मानाबाद तर रजत पदक हे पो.उप.नि. रमेश चव्हाण,(औरंगाबाद ग्रामीण) एस.आर. खटावकर, (बीड), यांनी पटकावले तर 2) फिंगरप्रिंट टेस्ट मध्ये सपोनि एस.एन. वडते (जालना) (सुर्वण पदक) तर पो.उप.नि. एस.आर. खटावकर, 3)मेडिको मध्ये सपोनि एस.एन. वडते जालना सुर्वण पदक, सपोनि सी.एस. घुसिंगे, जालना ( रजत पदक) 4) निरीक्षण चाचणी – वाय.सी. मंडोळे उस्मानाबाद सुर्वण पदक तर जी.पी. वाघ जालना (रजत पदक) 5) पोलीस पोर्टे्ट चाचणी – एन.बी. सावशे बीड (सुर्वण पदक ) तर एल.पी. पाटील उस्मानाबाद (रजत पदक) ब) पोलीस फोटोग्राफी स्पर्धा एच. एफ. शेख उस्मानाबाद (सुर्वणपदक) तर जी.पी.वाघ जालना (रजत पदक) क) पोलीस व्हिडीओग्राफी स्पर्धा – पोउपनि. आसिफ शेख जालना (सुर्वण पदक) तर शंकर शिंगरवाड जालना, (रजत पदक) ड) घातपात विरोधी तपासणी स्पर्धा – रामचंद्र मात्रे औरंगाबाद ग्रामीण सुर्वण पदक तर विजय खरात जालना, एच.पी.दराडे बीड, यांना रजत पदक इ) संगणक कौशल्य क्षमता- सागर बावस्कर जालना, योगेश मोईन, औरंगाबाद ग्रामीण, प्रदीप पाचरणे जालना,एन.बी. चव्हाण (जालना) यांना (सुर्वण पदक) तर मुकेश वाघ, औरंगाबाद ग्रामीण, ए.एस. मोरे, उस्मानाबाद, जीडी. घोरपडे, यांना (रजत पदक) ई) श्वान क्षमता चाचणी मध्ये डॉग रॅम्बो व अभय गणेश उस्मानाबाद यांना ट्रकिंग मध्ये सुवर्ण तर डॉग ज्युलिया पोह/जोग औरंगाबाद ग्रामीण यांना (रजत पदक) तर स्फोटक तपासणी मध्ये डॉग परी व हस्तक आर.बी. माळगे जालना यांना सुर्वण पदक तर डॉग प्रिंस हस्तक आर.जे. जाधव औरंगाबाद ग्रा. यांना (रजत पदक) तर अंमली पदार्थ तपासणी मध्ये डॉग बोल्ट हस्तक एस.जे. वखरे बीड यांना (सुर्वण पदक ) तर डॉग कॅन्टन हस्तक एस.पी. वडणे उस्मानाबाद यांना (रजत पदक ) मिळाले आहे.यामध्ये 1) जालना संघास- 09 सुर्वणपदक तर 05 रजत पदक , उस्मानाबाद संघास 06 सुर्वणपदक तर 05 रजत पदक, औरंगाबाद ग्रामीण संघास 04 सुर्वणपदक तर 08 रजत पदक, बीड संघास 02 सुर्वण पदक तर 03 रजत पदक प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सर्वसाधारण विजेते पद हे जालना संघास तर सर्व साधारण उपविजेते पद हे उस्मानाबाद यांनी पटकावले आहे. यातील विजेते हे राज्यस्तरावरील पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रतिनिधीत्व करणार आहेत. पुढील पोलीस कर्तव्य मेळाव्याचे यजमान पद हे डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक,यांचे हस्ते ध्वज हस्तांतरण बिड जिल्हयास देण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमांचे समारोपीय आभार प्रदर्शन महक स्वामी, सहा.पोलीस अधीक्षक वैजापुर यांनी केले .
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna
दिलीप पोहनेरकर,942221917