Jalna Districtजालना जिल्हा
केदार वाकडीच्या धरणात सेलूच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
परतुर- परभणी जिल्ह्यात असलेल्या सेलू येथील दोन तरुणांचा परतुर तालुक्यात असलेल्या केदार वाकडी येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक 9 रोजी दुपारी घडली.
सेलू येथे गायत्री नगरात राहणारे रोहीत दिपक टाक वय 23 वर्षे आणि नितीन गुणाजी साळवे वय 25 वर्षे हे दोघे आज दुपारी केदार वाकडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेले होते. ते बुडत असताना या तळ्यात मच्छीमारी करणाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी तळ ठोकून आहेत.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com