1.
Jalna Districtजालना जिल्हा

संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी बुधवारी जिल्ह्यात; अवजड वाहतुकीमध्ये मोठे बदल

जालना – शेगावीचे राणा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वारी केल्यानंतर परतीच्या प्रवासात आहे . दिनांक 12 ते 14 हे तीन दिवस ती जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखीमध्ये सुमारे 700 ते 800 वारकऱ्यांचा समावेश असल्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि विवादित परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने या तीन दिवसांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

पायदळी पालखी परंपरेनुसार बुधवार दिनांक 12 रोजी ही पालखी जालना जिल्ह्यामध्ये  प्रवेश करणार आहे. दिनांक 13 रोजी गोंदी आणि अंबड हद्दीत मुक्काम करून दिनांक 14 रोजी ही पालखी गोलापांगरी मार्गे जालना शहरात येणार आहे. दिंडी सोबत असलेले वारकरी आणि संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पालखीला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्राप्त अधिकारानुसार अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी काही आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेला बदल पुढील प्रमाणे .दिनांक 12 रोजी सकाळी आठ वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरून उड्डाणपुलाच्या खालील बाजूने येणारी अवजड वाहने थांबवून सदर वाहने पाचोड अंबड मार्गे जालना कडे येतील आणि जालन्याहून जाणारी वाहने देखील याच मार्गे जातील .

दिनांक 13 रोजी सकाळी तीन वाजल्यापासून  रात्री अकरा वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून अंबड कडे येणारी सर्व अवजड वाहने पाचोड जामखेड फाटा किनगाव चौफुली बदनापूर मार्गे जालन्याकडे येतील आणि याच मार्गाने ती परत जातील.

दिनांक 14 रोजी सकाळी तीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून अंबड कडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वडीगोद्री- पाचोड- जामखेड फाटा -जामखेड- किनगाव चौफुली बदनापूर मार्गे जालन्याकडे येतील आणि याच मार्गाने ती परतही जातील. तसेच अंबड कडून जालन्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा प्रवेश बंद असून ही वाहने किनगाव चौफुली- बदनापूर मार्गे जालन्याकडे येतील आणि याच मार्गाने पाचोड मार्गे शहागड कडे जातील.

दिनांक 13 आणि 14 रोजी जालन्याकडून घनसावंगी कडे जाणारी वाहने रोहनवाडी- सूतगिरणी मार्गे घनसावंगी कडे जातील व घनसावंगी कडून जालन्याकडे येणारी वाहने त्याच मार्गे परत येतील. घनसावंगी कडून बीड कडे जाणारी वाहने तीर्थपुरी- गोंदी- शहागड मार्गे बीडकडे वळविण्यात आली आहेत. वरील सर्व मार्गांची जड वाहतूक दिनांक 12 ते 14 तारखेपर्यंत दररोज पहाटे तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंद राहणार आहे . दिनांक 14 तारखेला रात्री अकरा वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे .

ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button