प्रश्न सुटत नसतील तर पेन्शन आदालत घेता कशाला ?पेन्शन धारकांनी वाढवलं टेन्शन
जालना- मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पेन्शन अदालत आयोजित केली होती. परंतु ती अचानक पुढे ढकलल्यामुळे पेन्शन धारकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. त्या त्रासातच प्रश्न सुटत नसल्यामुळे पेन्शन धारकांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच टेन्शन वाढवले.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचेच कर्मचारी सेवानिवृत्तांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतात ही बाब वरिष्ठ कार्यालयाच्या लक्षात आल्यानंतर या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांना पेन्शन अदालत घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये ही पेन्शन आदालत आयोजित केली होती परंतु ती अचानक पुढे ढकलली आणि पुन्हा एकदा पेन्शन धारकांची हेळसांड केली. काल दिनांक ११ रोजी ही पेन्शन आदालत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. यावेळी पेन्शन धारकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले .दर दोन-तीन महिन्याला लांबत असलेले वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे यापूर्वी वारंवार आंदोलने आणि उपोषणे देखील केली आहेत तरी देखील प्रश्न सुटत नाहीत आणि आता पुन्हा पेन्शन आदालत बोलून जर प्रश्न सुटत नसतील तर आदालत घेताच कशाला? आम्ही जगायचं कसं? असे प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले .हातपंप देखभाल व दुरुस्ती विभागातून सेवानिवृत्त झालेले 42 कर्मचारी आहेत त्यांना मे आणि जून चे वेतन अजूनही मिळालेले नाही .त्यासोबत शिक्षक आणि केंद्रप्रमुखांना देखील देय होणारी वेतन वाढ अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172