… ते धावत्या रेल्वेत दारात उभे असलेल्या प्रवाशांचे पळवायचे मोबाईल! मुकुंदवाडी पोलिसांनी पकडली टोळी
औरंगाबाद- धावत्या रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाईल घेऊन पळणारी टोळी मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्याकडून 38 मोबाईल जप्त केले आहेत.
चिकलठाणा ते मुकुंदवाडी दरम्यान रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची गांभीर्याने दखल घेत मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे विशेष पथक कामाला लागले .या पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे यांनी मुकुंदवाडी हद्दीतील गुन्हेगार आरोपींचा शोध घेत असताना तीन विधी संघर्ष बालक(अल्पवयीन मुलं) या मोबाईलची चोरी करत असल्याचे त्यांना समजले. त्यासोबत रेल्वे गेट 56 येथे तीन मुलं मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 11 रोजी विशेष पथकाने सापळा रचला आणि मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
असा पळवायचे मोबाईल. चिखलठाणा येथून रेल्वे निघाल्यानंतर मुकुंदवाडी जवळ रेल्वेची गती मंदावते. या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान हे तिघेजण मोबाईलची चोरी करायचे. दोघेजण मुकुंदवाडी स्थानकाच्या दिशेने उभे राहायचे आणि एक जण चिखलठाणाच्या बाजूने उभे राहायचा. रेल्वेच्या कुठल्या डब्याच्या, दारामध्ये उभा राहून प्रवासी बोलत आहे याचा इशारा चिकलठाणा कडचा मुलगा मुकुंदवाडी कडे उभे असलेल्या मुलांना करायचा आणि त्या अनुषंगाने रेल्वेची गती कमी झाली की ही बालके त्या प्रवाशाच्या हातावर काठी मारायचे. त्यामुळे तो मोबाईल खाली पडायचा आणि हा मोबाईल घेऊन ही मुले पळून जायची. यासोबतच रेल्वे पटरीच्या बाजूला रेल्वेच्या काही कामासाठी उभे केलेले चबुतरे आहेत या चबुतऱ्यावर उभा राहिल्यानंतर रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या माणसांपर्यंत सहज हात पोहोचू शकतो. याचा देखील ते फायदा घ्यायचे आणि रेल्वेची गती मंदावल्यानंतर चबुतऱ्यावर उभा राहून सहजासहजी प्रवासाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जायचे .असे सुमारे 38 मोबाईल मुकुंदवाडी पोलिसांनी जप्त केले आहेत. मोबाईल चोरीचे सुमारे 300 गुन्हे रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबाद येथे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा उकल करण्याचे काम सध्या सुरू आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, आदींनी हा तपास लावला .हरवलेल्या मोबाईलची तक्रार दिली असेल तर मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172