सटवाई तांडा येथे डेंग्यूचे थैमान; तिघांचा मृत्यू दहा दिवसांच्या बालकाचाही समावेश
जालना -पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सातवाई तांडा येथे डेंग्यू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे तिघा जणांना आपला जीव गमावा लागला आहे तर अनेक जण रुग्णालयात भरती आहेत, कांही जणांची उपचारानंतर सुट्टी ही झाली आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून या तांड्यावर आरोग्य विभागाच्या वतीने औषधी फवारणी, धूर फवारणी, आणि पाण्यामध्ये औषधी टाकण्यात येत आहेत. अजूनही या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यासोबत रुग्णालयात झालेल्या खर्चाने येथील नागरिक हतबल झाले आहेत.
या तांड्याच्या परिसरामध्ये सुमारे 138 घरे आहेत आणि अनेकांना या डेंग्यूची लागण झाली आहे. अनेकजण खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत. दरम्यान अधिकृत माहितीनुसार या परिसरात एका गर्भवती महिलेचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या दहा दिवसाच्या बाळाचा ही डेंग्यूणी मृत्यू झालाअसल्याचा दावा करण्यात आला आहे.आणि अन्य एक महिला ही देखील डेंगूच्या बळी ठरली आहे. हे एवढे चित्र समोर असताना देखील खाजगी रुग्णालयातील डेंग्यूचे आलेले अहवाल शासन मानायला तयार नाही त्यामुळे शासनाने खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे अहवाल शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यानुसार प्राध्यापक व विभागप्रमुख सूक्ष्मजीव जीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी जिल्हा हिवताप अधिकारी जालना यांना दिनांक सात जुलै च्या पत्रानुसार सात पैकी तिघाजणांना डेंग्यूची लागण झाले असल्याचे अधिकृत कळविले आहे आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांनी जालना नगरपालिकेला पत्र देऊन या तांड्यावरील एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. परंतु या संदर्भात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे..
या ठिकाणी एकूण तीन बळी हे डेंग्यूच्या आजाराने गेले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .जिल्हा हिवताप कार्यालय नगरपालिका आणि खाजगी रुग्णालयाचे वतीने या परिसरामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करून भीती कमी करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.
नुकसान भरपाई द्यावी या परिसरात राहणारे सर्वच लोक हे हातावर पोट भरणारे आहेत. त्यामुळे या डेंग्यूसदृश्य आजारावर उपचार करण्यासाठी 25 ते 40 हजार रुपये खर्च करावे लागले आहेत. पर्यायाने ऐपत नसतानाही कर्ज काढून हे उपचार करावे लागत असल्यामुळे शासनाने या उपचाराचा खर्चासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे .
तारांकित प्रश्न राज्यामध्ये गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे आणि या प्रश्नासंदर्भात विधान परिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र विधान परिषद सचिव एक चा कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना दिनांक दहा जुलै रोजी पत्र पाठवून राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून गर्भवती महिलांच्या मृत्यू संदर्भात माहिती मागविली आहे. त्यामुळे या तांड्यावर झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूची दखल घेतल्या जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172