हा छंद जीवाला लावी पिसे! सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच असंही “राष्ट्रीय कर्तव्य”
जालना दि.15- शासकीय सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना, आपण शासनाची खूप सेवा केली आहे आणि आता आराम करायचा! असं म्हणणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चपराक न देता त्यांना प्रेरणा देणारं राष्ट्रीय कर्तव्य सध्या जिल्हा परिषदेचा एक सेवानिवृत्त कर्मचारी पार पाडत आहे ,मोहन वाणी असं या 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोहन वाणी यांची वृक्षारोपणासाठी धडपड सुरू होती .परंतु कुठे जागाच मिळत नव्हती .जागेचा शोध घेत असताना जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेली खडकाळ जमीन त्यांच्या नजरेस पडली आणि आज तिथे वृक्षारोपण करून हा परिसर सुंदर आणि कारंजे लावून कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. शासनाचा कुठलाही पैसा न घेता खिशातल्या पैशाने आणि घरातल्या पाण्याने हे वृक्षारोपण केलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या पाठीमागेच मोहन वाणी यांचं घर असल्यामुळे या घरातून थेट पाणी या झाडांना दिल्या जातं त्यासोबत फक्त झाडेच जगवली नाही तर इथे सुंदर असं कारंज देखील आहे .त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनाला सुखावणारे हे दृश्य आहे. आणखी एक विशेष म्हणजे या झाडांच्या बाबतीत झालेल्या घडामोडी या त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी पत्राने कळविलेल्याआहेत. परंतु कुठल्याही आर्थिक मदतीची मागणी त्यांनी केलेली नाही. आपल्या सेवानिवृत्ती वेतनामधून त्यांनी हा खर्च केला आहे आणि हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं ते म्हणतात.
स्वतःचा छंद जोपासत राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवत हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी इथे भेट दिली आणि मोहन वाणी यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
त्यांना या कामात राहुल कांबळे यांची मदत झाली आहे. तसेच इथे लावलेल्या झाडांमध्ये मोठ्या प्रकारच्या झाडांत उंबर ,पिंपळ, पळस, आपटा ,शमी, गुलमोहर यांचा समावेश आहे. फुल झाडांमध्ये कन्हेर ,चांदी पाट,जास्वंद, पारिजात, चाफा, लाजाळू यांचा तर औषधी वनस्पती मध्ये तुळस, आडुळसा, कोरफड, अक्कलकारा, गुळवेल यांचा समावेश आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172