Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

राष्ट्रीय सणानिमित्त 335 महिलांना मिळणार जि.प.ची”गोड बातमी”

जालना -जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राष्ट्रीय सण म्हणजेच 15 ऑगस्ट निमित्त गोड बातमी मिळणार आहे .मागील महिन्यात निघालेल्या रिक्त पदांसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात त्यांच्या हातात या “गोड बातमीचे “आदेश मिळणार आहेत.

जालना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाड्यांसाठी मिनी सेविका आणि मदतनीस अशा एकूण 412 जागा निघाल्या होत्या त्यासाठी अर्ज ही मागविण्यात आले होते परतुर वगळता जिल्ह्यातील  इतर सर्व तालुक्यांची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे परतुर ची अर्ज मागविण्याची प्रक्रिया सोमवार दिनांक 17 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे ही सर्वच प्रक्रिया जुलै अखेर पूर्ण होणारआहे. तूर्तास ज्या अंगणवाडीचे अर्ज आलेले आहेत त्यांची छाननी सुरू झाली आहे. कोणताही पद्धतीचा गैरप्रकार होऊ नये म्हणून छाननी झालेल्या अर्ज दुसऱ्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केले जाणार आहेत. अर्जाची पहिली यादी त्यानंतर या अर्जावरील आक्षेप मागितले जाणार आहेत आणि त्या नंतर अंतिम यादी हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर 15 ऑगस्ट च्या सुमारास निवड झालेल्या महिलांना त्यांचे आदेश मिळण्याची शक्यता महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल- कोरे चाटे यांनी व्यक्त केली आहे.

उच्चशिक्षित उमेदवारांचे अर्ज- दोन्ही पदांसाठी सुमारे 400 जागा भरण्यात येणार आहेत,आणि 4000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. या पदांसाठी बारावी पासची पात्रता आवश्यक असताना देखील डीएड, बीएड, आयटीआय, तंत्रनिकेतन अशा वेगवेगळ्या शिक्षण घेतलेल्या महिलांनी देखील अर्ज केले आहेत. सुमारे पाच ते सात हजारापर्यंत दर महा पगार असताना देखील उच्चशिक्षित महिलांनी या  पदाला अर्ज केले आहेत.

या आहेत रिक्त जागा जालना-1 मदतनीस 17, घनसावंगी- मिनी सेविका तीन मदतनीस 47, जालना-2मिनी सेविका दोन मदतनीस बावीस, परतुर-मदतनीस 26, बदनापूर-मिनी सेविका तीन मदतनीस 22, मंठा-मिनी सेविका दोन मदतनीस 27, अंबड-मिनी सेविका चार मदतीने 42, भोकरदन-मिनी सेविका एक मदतनीस 25, अंबड-2 मिनी सेविका एक मदतनीस 25,भोकरदन-2मदतनिस 17, घनसावंगी मिनी सेविका दोन मदतनीस 42,जाफराबाद- मदतनीस 82 अशा एकूण 412 महिलांची भरती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत केली जाणार आहे.

Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button