नूतन जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा एक डॉक्टर;जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांची बदली; यवतमाळवून डॉ.पांचाळ येणार
जालना -सण 2021 मध्ये कोविड संपण्याच्या काठावर जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड यांनी जालना जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता सुमारे अडीच वर्षांमध्येच डॉ. विजय राठोड यांची बदली सहाय्यक कार्यकारी संचालक महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मुंबई येथे करण्यात आले असून त्यांच्या जागी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सध्या यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ हे येत आहेत .राज्य शासनाने नुकत्याच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये पूर्वी जालन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती निमा अरोरा या अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या त्यांची आता संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई म्हणून बदली करण्यात आले आहे ,तर जालन्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या मराठी भाषा विकास मंत्रालय येथे सचिव म्हणून कार्यरत होते त्यांची आता एग्रीकल्चर डेव्हलपमेंट मुंबई येथे सेक्रेटरी म्हणून बदली करण्यात आली आहे.
डॉ. विजय राठोड यांनी जालना जिल्हाधिकार्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही भाजपामधील वाद चव्हाट्यावर आले होते आणि विशेष म्हणजे या दोन्ही भाजप कार्यकर्त्यांनी म्हणजेच आमदार बबनराव लोणीकर गट आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या मांडून गोंधळ घातला होता . त्यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती .परंतु आपल्या मध्ये संस्कार रुजविणारे सर्वच गुरु असतात असे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगणाऱ्या डॉ. विजय राठोड यांनी कोणत्या गुरुचा सल्ला ऐकला माहित नाही परंतु हे प्रकरण संस्काराचा फायदा घेत त्यांनी हे दोन्ही प्रकरण सीताफिने हाताळले. शांतता प्रिय आणि प्रसिद्धीला सामोरे न जाणारे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विजय राठोड यांची कारकीर्द ना वादग्रस्त ठरली ना कार्यशील ठरली. दरम्यान त्यांच्या काळामध्ये सामाजिक उपक्रमांना पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. त्यामध्ये पारशी टेकडीचा विकास , जालनेकरांसाठी कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न त्यांनी प्राधान्याने मार्गी लावले आहेत.
यवतमाळ होऊन येत असलेले डॉ. पांचाळ हे 2016 मध्ये आयएएस झालेले अधिकारी आहेत आणि ते सध्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी पदाचा त्यांच्याकडे हा पहिलाच पदभार आहे. असाच पदभार डॉ. विजय राठोड यांच्याकडे देखील जिल्हाधिकारी म्हणून पहिला पदभार दिल्या गेला होता.
Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com