आपले शत्रू ओळखा? भिडे गुरुजींचे ढालकऱ्यांना आवाहन
जालना- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जालन्यामध्ये भिडे गुरुजींच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. “छत्रपती शिवरायांचे 32 मन सुवर्ण सिंहासन” या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडल्याचे समजते . सिंहासन झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी ढालकऱ्यांची नावे नोंदविल्या गेली आहेत, तसेच यथाशक्ती यासंदर्भात निधी देखील उभारला जात आहे, दरम्यान या बैठकीला मार्गदर्शन करताना भिडे गुरुजींनी आपले शत्रू कोण आहेत? हे ओळखा असे आवाहन ढालकऱ्यांना केले आहे. त्यासोबत हिंदुस्थान असा एकमेव देश आहे की ज्या देशाची उत्पत्ती देवांपासून झाली आहे. त्यामुळे या देशाच्या स्थापनेचा असा विशिष्ट दिवस किंवा तिथी नाही जी इतर देशांची आहे .त्यामुळे देवनिर्मित हा देश असल्यामुळे याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आपण काम करावे असेही ते म्हणाले. हिंदुस्तानची पार्श्वभूमी सांगत असताना ते म्हणाले की, इंग्रज मसाले विकण्याच्या निमित्ताने भारतात आले आणि राज्यकर्ते झाले असाच काही प्रकार सध्या होत आहे, हे धोके आपण ओळखायला हवे आहेत. यासोबत चायनीज फुडच्या नावाखाली परदेशी आक्रमणही व्हायला लागले आहे त्यापासून तरुणांनी दूर राहून सैन्यामध्ये भरती होण्यासाठीह प्रयत्न करावे असे आवाहन भिडे गुरुजींनी केल .
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या ढालकरांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी येणाऱ्या भिडे गुरुजींना संभाजी ब्रिगेडने विरोध केला होता आणि त्यांची ही बैठक देखील उधळून लावण्याचा इशारा दिला होता.मोदीखाना भागामध्ये तिळवंत तेली समाजाच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली.
Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com