नगर जिल्ह्यातून येऊन जालना शहरातून पळवायचा रोख; रक्कम तपास एका गुन्ह्याचा कबुली दोन गुन्ह्यांची
जालना -दोन दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास खाजगी नोकरी करणारे योगेश राजेंद्र मालोदे यांच्या जवळ असलेली 14 लाख 70 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविली होती. भर दिवसा झालेल्या या पळवा- पळवी मुळे करोडोंची उलाढाल असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे सर्वच पोलीस यंत्रणा तपासाच्या कामाला लागली होती .या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोघांनीही शर्तीचे प्रयत्न केले आणि 24 तासांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना हा तपास लावण्यात यश मिळाले आहे.
या संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की ,अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सुलतानपूर येथील सुदाम विक्रम जाधव24, हा जालना शहरात यायचा आणि त्याचा सुंदरनगर चंदनझिरा भागात राहणाऱ्या विठ्ठल भीमराव अंभोरे 23 याच्या मदतीने ही रोख रक्कम पळवायचा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सुदाम जाधव याला त्याच्या राहत्या घरी सुलतानपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल अंभोरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला आहे दरम्यान या पळवलेल्या रोख रकमेपैकी काही रक्कम आरोपीने एका पतसंस्थेमध्ये कर्जाच्या हप्त्यापोटी भरली आहे. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच सुदाम जाधव आणि विठ्ठल यांनी दिनांक 10 जुलै रोजी आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. नवीन जालना भागातील सचिन शिवाजी गुडा हे लक्ष्मीमाता मंदिराजवळून जात असताना त्यांच्या हातात असलेली एक लाख 46 हजार रुपयांची बॅग हिसकावून या दोघांनी पळ ठोकला होता. या दोन्ही आरोपींकडून चोरीमध्ये वापरलेली आणि अहमदनगर औद्योगिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल असलेली चोरीची मोटरसायकल, औद्योगिक परिसरातून चोरी गेलेली रोख रक्कम आणि लक्ष्मी माता मंदिराजवळून पळवलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे .या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, राजेंद्र वाघ, गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, कृष्णा तंगे, लक्ष्मीकांत आडेप, सचिन चौधरी, कैलास चेके, सुधीर वाघमारे, आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com