1.
Jalna Districtजालना जिल्हा

दुसऱ्याला सोडवणारा पोलीसच अडकला लाचेच्या जाळ्यात

जालना -लाच घेऊन दुसऱ्यावर होणारी कारवाई टाळणारा पोलीसच लाचेच्या जाळ्यात सापडला आहे. त्यामुळे “आ बैल मुझे मार “अशी परिस्थिती या पोलीस कर्मचाऱ्याची झाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार त्याचे आई-वडील यांच्यावर मौजे कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्यावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे .या प्रकरणात तक्रारदाराला वगळण्यासाठी आणि त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा कमी करण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल बक्कल नंबर 266 महादू पवार वय 56 वर्ष यांनी आज दोन हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधला. या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले आणि सायंकाळी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना महादू पवार यांना लक्ष्मीकांत नगर जवळ असलेल्या पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट मध्ये रंगेहात पकडण्यात आले आहे.

Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button