मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ ख्रिश्चन समाजाचे आंदोलन
जालना- मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचार अन्यायाच्या निषेधार्थ जालना येथे ख्रिश्चन समाजाच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज दिनांक 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले .या आंदोलनादरम्यान अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान मणिपूर येथे ख्रिश्चन समाजावर झालेल्या अन्यायाचा कडाडून निषेध करण्यात आला. तसेच तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. केंद्र सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे या सरकारचा देखील निषेध करण्यात आला. या निषेधाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जगदीश चौधरी, रविराज कांबळे, गंगाधर जगधने, अर्जुन आगम, पवन पाटोळे, रमेश लोखंडे ,कविता लोखंडे, अंजू मस्के ,अर्चना जोनवाल, अशा पाटोळे,आदी ख्रिश्चन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com