Advertisment
Jalna DistrictSerialsजालना जिल्हा

मुल आमचं नाही म्हणत पती आणि सासूचा जाच; विवाहितेची आत्महत्या

जालना- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागात राहणाऱ्या भाग्यश्री चिप्पावार (वय 29) या महिलेस पती राजेश सत्यकुमार चिप्पावार आणि सासू गंगाबाई सत्यकुमार चिप्पावार हे दोघेजण चारित्र्यावर संशय घेऊन गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी भाग्यश्री च लग्न झालं होतं आणि त्यानंतर दोन वर्षाचा एक मुलगा होता हा मुलगा झाल्यापासून तिचा छळ सुरू होता.

भाग्यश्री बाहेरील व्यक्तीशी बोलत आहे, असा आरोप करून तिच्याजवळ असलेला मोबाईलही हिसकावून घेण्यात आला होता.विवाहितेला झालेलं मूल हे आमच्यापासून  नाही तर, ते  बाहेरच्या अनैतिक संबंधातून झाले आहे, असा आरोप सासू आणि नवरा करीत होते.आणि याच कारणावरून  मारहाण करून छळ करीत होते. या सततच्या छळाला कंटाळलेल्या भाग्यश्री हिने काल दि.31 जुलै सायंकाळी उशिरा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .
याप्रकरणी मयत भाग्यश्री चिप्पावार यांचे भाऊ गणेश उपलांचेवार (रा. पेठ अमलापूर गल्ली, देगलूर, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आज दुपारी मयत महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले . घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, उपनिरीक्षक पदमने आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna. com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button