वनरक्षक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल; सुरक्षेचे धिंडडवडे
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिये (ता. करवीर) येथे असलेल्या आय.ओ.एन.डिजिटल परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने थेट मोबाईल घेऊन एक तास परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार दि.3 रोजी समोर आला आहे.इतर विद्यार्थ्यांना हा प्रकार समजतात ते विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आक्रमक झाले .स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
2100 वनरक्षक पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा टीसीएस या कंपनीकडून घेण्यात येत आहेत. यापूर्वीच आमदार रोहित पवार यांनी टीसीएस कंपनी वरून विधान परिषदेत आवाज उठवला होता. तर या पदासाठी 15- 15 लाख रुपये घेऊन जागा मॅनेज केल्याची चर्चा देखील सुरु आहे. त्यातच आज गुरुवारी शिये येथील आयओएन परीक्षा केंद्रावर वनरक्षक पदासाठी परीक्षा सुरू होती, मात्र एका विद्यार्थ्याने चक्क एक तास मोबाईल सोबत घेऊन पेपर सोडवल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आक्रमक झाले होते. सदर प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. जर योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही यावेळी समन्वय समितीचे गिरीश फोंडे आणि जावेद तांबोळी यांनी दिला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172