तहसीलदाराने घेतली लाच ,पण पदाला शोभणारी
नाशिक- लाच घ्यायची तर ती आपल्या पदाला शोभलेही पाहिजे त्यामुळे कदाचित तहसीलदाराच्या पदाला शोभणारी पंधरा लाखांची लाच नाशिकच्या तहसीलदाने घेताना त्यांना रंग हात पकडले आहे.
नाशिक जिल्ह्यातील राजुर बहुला तालुक्यात एका शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून मुरूम उत्खनन करण्यात आला. याबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने या मुरूम उत्खननाबाबत संबंधित शेतकऱ्याला पाचपट दंड आणि स्वामीत्व धन असलेल्या जागेचे भाडे असा एकूण एक कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली. हा दंड शेतकऱ्याला मान्य नसल्यामुळे त्याने उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. या अधिकाऱ्यांनी या दंडाच्या पुनश्च चौकशीचे आदेश नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार तुकाराम बहिरम व 44 वर्ष यांना दिले .या आदेशानुसार तहसीलदार स्थळ पाहणी करण्यासाठी संबंधित उत्खननाच्या ठिकाणी गेला .दरम्यान या शेतीचा मालक वयोवृद्ध असल्यामुळे स्वतः हजर राहू शकला नाही परंतु त्याने प्राधिकत केलेला दुसरा व्यक्ती तिथे उपस्थित होता. आणि त्याने उत्खनन केलेला मुरूम हा इतरत्र न वापरता त्याच ठिकाणी वापरल्याचे तहसीलदारांना वारंवार सांगितले परंतु तहसीलदार हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . त्यामुळे तहसीलदाराने संबंधित शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली ,हा दंड चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी आणि तो माफ करून घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे 15 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. आणि तडजोडी आणती 15 लाख रुपये देण्याचे ठरले .परंतु शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचला असता शेतकऱ्याकडून 15 लाख रुपयांची लाच घेतल्याची कबुली तहसीलदार नरेशकुमार बहिराम यांनी दिली आहे याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172