ते पुन्हा आले, त्यांनी दिली शाबासकी तर यांनी जोडले हात, म्हणाले घ्या मला पदरात
जालना – जालना आणि अंबड नगरपालिकेमध्ये पाण्याच्या वाटाघाटीवरून सकाळी सुरू झालेला वाद दुपारी पालकमंत्री आणि दोन्ही आमदार एका टेबलवर बसतात निकाली निघाला आहे.
सकाळी 11 वाजता जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन बदनापूर चे आमदार नारायण कुचे हे जालनेकरांचे पाणी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या अंबड नगरपालिकेला देण्यासाठी दबाव आणत आहेत, आणि त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता .त्यानंतर दुपारी पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक झाली या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेमध्ये सुरुवातीच्या काही मिनिटातच आमदार गोरंट्यालयांनी काढता पाय घेतला .तेवढ्यात पत्रकारांनी जालनाच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करताच प्रवेशद्वारात गेलेले आमदार गोरंट्याल पुन्हा परत आले आणि तिघांनी मिळून हा पाणी प्रश्न कसा सोडोला ते सविस्तरपणे सांगितले. तूर्तास जरी पाणी प्रश्न सुटला आहे असे दोन्ही आमदार सांगत असले तरी सुटलेल्या पाणी प्रश्नाच्या निधीसाठी अद्याप पर्यंत कोणतीही तरतूद राज्य शासनाने केलेली नाही .त्यामुळे जनतेने काय आहे ते ओळखून घ्यावे. त्यातच आज जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले आहे त्यामुळे भविष्यात जालनेकारांना महानगरपालिका कोणकोणत्या सुविधा देणार? का आहे त्या सुविधा महागड्या करणार? हे येणारा काळच सांगणार आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna. com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172