Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

डेंगू मुळे पुन्हा एका तरुणीचा मृत्यू; खाजगी हॉस्पिटल चा रिपोर्ट हिवताप अधिकाऱ्याला अमान्य

जालना- महिनाभरापूर्वी जालना शहरातील सटवाई तांडा या भागात तिघा जणांचा डेंगू मुळे मृत्यू झाला होता. याची नोंद सरकार दरबारी देखील आहे. त्यामुळे हा आजार पसरत असल्याचे दिसत असतानाही हिवताप कार्यालयाच्या वतीने डेंगू चे लक्षणे निष्पन्न झाल्यानंतर देखील यासंदर्भात काय उपाययोजना केल्या याविषयी कोणतीच माहिती मिळत नाही ,आणि त्यापुढे जाऊन हे काम आता महानगरपालिकेचे आहे असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम जिल्हा हिवताप कार्यालयाकडून केले जात आहे.खरेतर कीटकजन्य आजारांपासून अटकाव करण्याची जिल्हा हिवताप कार्यालयाची विशेष जबाबदारी आहे .असे असताना देखील शहरांमध्ये डेंगू या आजाराचे चार बळी ठरले आहेत. या संदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गावंडे हे कोणती उपाययोजना केली याविषयी काहीच माहिती द्यायला तयार नाहीत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेला पत्र दिले आहे त्यांनी देखील यासंदर्भात उपाययोजना केल्या पाहिजेत असे उत्तर देऊन मोकळे होत आहेत .गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा हिवताप कार्यालयातील डॉ. गावंडे यांच्या बदल्यांचा खेळ चालू आहे. डॉ. गावंडे यांची बदली झाली होती आणि त्यांच्या ठिकाणी कोणाला पदभार द्यायचा याविषयी वरिष्ठांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देखील विचारणा केली होती. त्यानंतर पुन्हा गावंडे यांच्याकडेच हा पदभार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एक पाय छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि दुसरा पाय जालन्यात ठेवून जाणे येणे करणाऱ्या हिवताप अधिकारी डॉ गावंडे यांना जालन्यातील जनतेशी काही देणेघेण नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान सटवाई तांडा येथे झालेल्या तीन मृत्यूनंतर दिनांक 11 ऑगस्ट रोजी घाटी रोडवर असलेल्या स्वामी समर्थ नगर मधील श्वेता पाटील या 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा डेंगू सदस्य आजाराने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .सुरुवातीला ताप आल्यानंतर तिला शहरातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते तिथे काहीच फरक न पडल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे भरती करण्यात आले .दुर्दैवाने या हॉस्पिटलमध्ये तिचा दिनांक 11 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूच्या कारणा संदर्भात डॉ. गावंडे यांना विचारले असता आमच्याकडे अजून रिपोर्ट आला नाही असे म्हणून हात झटकले आहेत.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button