नेमक्या कोणत्या व्हीजी वकिलांकडे राडा करण्याची घेतली होती सुपारी? नावातील साम्यामुळे हल्लेखोर गोंधळले; पाच दिवसांपासून पोलिसांना लागेना पत्ता
परतूर- शहरातील व्हीजी वकील यांच्याकडे असलेली रक्कम वसूल करा अन्यथा त्यांचे हातपाय तोडा असे म्हणत अज्ञात इसमाने सुपारी देऊन सहा हल्लेखोरांना गुरुवार दिनांक 10 रोजी परतूर शहरात पाठवले होते .परंतु शहरात व्हीजी या नावाचे वकिली व्यवसाय करणारे दोन वकील आहेत. त्यामध्ये विजय गणपतराव कुलकर्णी आणि विष्णू गणपतराव पाटील ही दोन नावे आहेत त्यामुळे कोणत्या व्हीजी वकिलाकडून वसुली करायची आणि नाही दिले तर हात पाय तोडायचे या गोंधळात हल्लेखोर परत गेले आहेत .नेमक्या कोणत्या व्हीजी वकिलांची सुपारी घेऊन हे हल्लेखोर आले होते यासंदर्भात परतुर शहरात तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु ज्या दोन्ही व्हीजी वकिलांच्या परिवाराने ही परिस्थिती हाताळली ते दोन्ही परिवार भीतीच्या सावटाखाली आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे परंतु पाच दिवसांपासून पोलिसांना या हल्लेखोरांचे धागेदोरे सापडत नाहीत.
येथील प्रसिद्ध वकील व्ही.जी.कुलकर्णी व व्ही.जी. पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या घरी स्कॉर्पिओ या चार चाकी वाहनातून सहा अनोळखी आरोपी घरी जाऊन त्यांच्याकडे अडीच लाख रुपये बाकी आहे ते फोन घेत नाहीत अशी बतावणी करत तुम्ही ते पैसे द्या नसता त्यांचे हात पाय तोडू, अशा प्रकारची धमकी देत लुटण्याचा प्रयत्न केला. गुरुवार दिनांक 10 रोजी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान दोन्ही वकिलांच्या घरी हा प्रकार घडला. न्यायालयीन कामानिमित्त मंठा येथे व्ही.जी.पाटील आकणीकर हे गेलेले होते. घरी त्यांच्या पत्नी या एकट्या होत्या. दुपारी तीन च्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीतून अनोळखी सहा इसम उतरून व्हीजी पाटील यांच्या घराच्या गेटच्या आत जाऊन जोरात आवाज दिला. यावेळी त्यांच्या आजारी असलेल्या पत्नी यांनी आपले काय काम आहे ? वकील साहेब बाहेरगावी गेले असे सांगितले, असता अनोळखी आरोपींनी वकील साहेब आमचा फोन घेत नाहीत, त्यांच्याकडे आमचे अडीच लाख रुपये आहेत आम्हाला आत्ताच्या आत्ता सर्व रक्कम पाहिजे नसता या ठिकाणी धिंगाणा घालू व वकील साहेबांना बेदम चोप देऊ, अशा प्रकारची धमकी दिली.त्याच वेळ शेजारील एक महिला टीव्ही पाहताना गाडीचा सतत आवाज येत असल्याने, घराबाहेर येऊन गाडी कोणाची? का सुरू आहे ? हे विचारताच या सर्वांनी चालू असलेल्या जीपमध्ये बसून पोबारा केला. सदरील प्रकार शेजारच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले,
आता दुसऱ्या व्ही.जी (कुलकर्णी) च्या घरी यानंतरच गाव भागातील जुन्या पोस्ट ऑफिस रोडवर राहत असलेल्या व्हीजी पाटील कुलकर्णी यांच्या घरी हेच आरोपी ४.३० च्या सुमारास गेले व अशाच प्रकारची बतावणी करत, वकील फोन उचलत नाही, असे म्हणत, त्याच्याकडे आमचे पैसे आहेत, असे म्हणत अडीच लाखाची मागणी केली व न दिल्यास वकील साहेबांचे हात पाय तोडू अशा प्रकारची धमकी दिली या प्रकारांनी हादरलेल्या गृहिणींना धक्का बसला परंतु याचवेळी ऍड. व्ही.जी. कुलकर्णी यांची बहिण बाहेर येऊन हल्लेखोरांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असता हे सर्व जीपमध्ये बसून पळून गेले. याप्रकरणी ऍड.व्ही. जी. कुलकर्णी व ऍड व्ही. जी. पाटील यांच्या फिर्यादीवरून परतुर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172