व्वा…मत्स्योदरी देवी मुळे मिळाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना शाबासकी
जालना -जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड येथील मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम पळवली होती. या प्रकरणाचा 24 तासात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आणि तीन आरोपींना मुद्देमालासह अटक केली .भाविकांच्या श्रद्धेचा असलेला हा विषय स्थानिक गुन्हा शाखेने झटपट छडा लावल्यामुळे त्यांचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची उपस्थिती होती. देवीची दानपेटी पळवल्यामुळे देवीने दिलेल्या या शाबासकीमुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
ही आहे टीम-पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कॉन्स्टेबल सामुयल कांबळे ,गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे ,सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप ,पोलीस नायक देविदास भोजने, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सहाने, कैलास चेके, धीरज भोसले ,महिला पोलीस नाईक श्रीमती चंद्रकला षडमल्लू.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172