“ती” त्रिमूर्ती सापडली; करियर घडविण्यासाठी गेली होती शिर्डीला; पोलिसांनी घेतले ताब्यात

जालना -जालना शहरातून 15 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झेंडावंदनासाठी जातो म्हणून निघालेले तीन विद्यार्थी संगणमताने बेपत्ता झाले होते. या तिघांनाही शिर्डी येथून जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .अंकित प्रकाश जाधव, स्वराज संतोष मापारी ,आणि हर्षद अशोक देवकर अशी या तिघांची नावे आहेत.
जालना येथून या तिघांनी संगणमत करून अंकित जाधव यांच्या स्कूटीवरून जालना ते शिर्डी तिघांनी प्रवास केला विशेष म्हणजे सर्व टोल नाके चुकवत लासुरमार्गे ते शिर्डीला पोहोचले .तिथे त्यांनी दत्तनगर भागामध्ये तीन हजार रुपयांची एक खोली ही किरयाने घेतली होती. दरम्यान लॅपटॉप चे काम करण्यासाठी त्यांनी वायफाय चालू केल्यानंतर पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले होते. त्यांच्या मार्गावर असलेल्या कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नागरे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर राऊत यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
बुधवारी रात्री या तिघांचे पालक दोन पोलीस आणि या पालकांचा एक मित्र नंदकुमार जावळे हे या मुलांच्या शोधासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले. रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र कुठेच ते सापडले नाहीत. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते मंदिर परिसरात आले असावेत आणि त्याच वेळी शोध घेत असलेल्या या सर्वांच्या नजरेस ही “त्रिमूर्ती” पडली. तिघांनीही नियोजनबद्ध घर सोडले होते सोबत बॅगा होत्या आणि त्यामध्ये कपडे देखील घेऊन गेलेले होते.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172