Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

हे केलं,हे करणार! लेखाजोखा वीस दिवसांचा- जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ

जालना- जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून वीस दिवसांपूर्वी डॉ. कृष्णानाथ पांचाळ यांनी पदभार घेतला आणि या वीस दिवसांमध्ये काय केलं आणि पुढील दिवसांमध्ये काय करणार याचा लेखाजोखा डॉक्टर पांचाळ यांनी आज पत्रकारांसमोर मांडला दरम्यान शहरांमध्ये असलेल्या विविध समस्या संदर्भात ईडी टीव्ही न्यूज ने देखील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. हा सविस्तर वृत्तांत वाचकांसाठी.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्यामध्ये भरीव काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग, मिरचीवरचे प्रोसेसिंग याच्यावर भर दिला जाणार आहे, पर्यटन क्षेत्रामध्ये अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार भोकरदन तालुक्यातील जाळीचादेव येथील पर्यटन क्षेत्राचा प्रस्तावही पाठवला आहे .त्याचप्रमाणे भोकरदन तालुक्यातीलच श्रीक्षेत्र राजुर येथील गणपती मंदिराभोवती टॉय ट्रेन (लहान मुलांसाठी )आणि तलावाच्या भोवती सुशोभीकरणाचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एक वेळा पाहणी देखील केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज दिनांक 18 रोजी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या इतर विभागांमध्ये भेटी देऊन उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची पाहणी केली असता दोन अधिकारी आणि सात कर्मचारी गैरहजर दिसून आले आहेत, त्यांना या संदर्भातील नोटीसही देण्यात आल्या आहेत .हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या जास्त तक्रारी आहेत .त्या कशा कमी करता येतील यासंदर्भात प्रयत्न केला जाणार आहे तसेच जालना शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला देखील प्राधान्य दिले जाणार आहे या संदर्भातील शहरात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा आणि त्यावर झालेल्या अतिक्रमणांचा आढावा घेण्याची काम सुरू आहे मोठ्या शहरांना सीसीटीव्हीची मोठी मदत होते त्यानुसार आता जालना शहरात देखील पुन्हा एकदा सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या मोहिमेला वेग दिला जाईल यासह इतरही माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button