Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

छगन भुजबळांच्या विरोधात ब्राह्मण समाज संतापला; शुक्रवारी धरणे आंदोलन

जालना- राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काढलेले अपशब्द या समाजाच्या चांगले जिव्हारी लागले आहेत .अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शुक्रवार दिनांक 25 रोजी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

संभाजी आणि शिवाजी ही नावे ब्राह्मणात नसतात असे म्हणून ब्राह्मण समाजाचा अपमान केला आहे त्यामुळे आज जालना येथील ब्राह्मण सभेचे इमारतीमध्ये शिवाजी जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच या निषेधाची बैठक पार पडली. आणि ब्राह्मणात शिवाजी आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला. छगन भुजबळांसारखी ब्राह्मण समाजाला नावे ठेवणारी प्रवृत्ती वाढत आहे, त्यामुळे जोपर्यंत यांना ब्राह्मण एकतेची शक्ती दाखवत नाहीत तोपर्यंत अशा प्रवृत्तींन आळा बसणार नाही असे मत ब्राह्मण समाजाचे झाले आहे. त्यामुळे आज दिनांक 21 रोजी ब्राह्मण समाजाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीमध्ये शुक्रवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बैठकीला कल्याणराव देशपांडे, किशोर तिवारी, सिद्धिविनायक मुळे ,सुरेंद्र न्यायाधीश, संतोष दाणी, मुकुंद कुलकर्णी, भगवान पुराणिक सतीश आकोलकर ,रवींद्र देशपांडे, सुरेश मुळे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी सौ. अरुणा फुलमावडीकर आदींची उपस्थिती होती.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button