संगीता लाहोटी खून खटला; दोन दिवसात तपासले चार साक्षीदार;
जालना- शहरातील पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या घरी नोकर असलेल्या भीमराव धांडे यांनी खून केल्याचा आरोप धांडे यांच्यावर करण्यात आला आहे. हा खून खटला फिर्यादीने केलेल्या मागणीनुसार सरकार पक्षाच्या वतीने प्रसिद्ध वकील उज्वल निकम हे लढत आहेत, तर बचाव पक्षाच्या वतीने एडवोकेट अनिरुद्ध घुले हे आपली बाजू मांडत आहे .यापूर्वी दिनांक 10 आणि 11 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यानंतर आता दिनांक 21 ,22 आणि 23 असे तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार होती परंतु फिर्यादी पक्षाच्या वतीने काही अडचण आल्यामुळे ही सुनावणी आता दिनांक 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. काल दिनांक 21 रोजी सीसीटीव्ही कॅमेरा चे काम करणारे राम जाधव आणि सीए खती यांची साक्ष नोंदविण्यात आली. आज दिनांक 22 रोजी दुसऱ्या दिवशी संगीता लाहोटी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेची साक्ष नोंदविण्यात आली. या महिलेने नोंदविलेल्या साक्षीनुसार या महिलेला आरडा ओरड ऐकू आल्यानंतर ती लाहोटी यांच्या घरात गेली आणि त्यावेळी भीमराव धांडे हे संगीता लाहोटी यांच्यावर वार करत होते त्यावेळी धांडे यांनी या महिलेला तू पण निघून जा नाहीतर तुला पण ठार मारून टाकेल असे म्हटल्याचे सांगितले आहे त्यावेळी तिथे दुसरे कोणीच नव्हते असेही त्या म्हणाल्या दरम्यान बचाव पक्षाच्या वतीने उलट तपासणी करत असताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तफावत आल्यामुळे मी अन फळ आहे आणि मला विचारलेला प्रश्न समजला नाही असेही त्यांनी सांगितले दरम्यान 14 तारखेला खून झाल्यानंतर पुढील दहा दिवस मी घराच्या बाहेरच पडले नाही आणि भीतीपोटी पुढे काय झाले याची देखील माहिती मी घेतली नसल्याचेही या महिलेने सांगितले याच वेळी बचाव पक्षाच्या वतीने फिर्यादीने तुम्हाला मदत केल फिर्यादीने तुम्हाला आर्थिक मदत केली म्हणून साक्ष देण्यास तयार झाल्या का असा प्रश्न विचारला असता या महिलेने नकार दिला आहे.
दुसरे साक्षीदार म्हणून जालना नगरपालिकेत कार्यरत असलेले कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार दिनांक 14 डिसेंबर रोजी त्यांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी फोन करून सरकारी पंच म्हणून बोलावले .त्यांच्यासोबत सुभाष तायडे यांना घेऊन ते संगीता लाहोटी यांच्या घरी गेले. त्यांच्या घराच्या काचा फुटलेल्या होत्या .तिथे एक दगड पडलेला दिसला ,त्यानंतर ऑफिसच्या बाजूच्या खोलीत भीमराव धांडे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, आणि हे धांडे आहेत हे हर्षवर्धन लाहोटी यांनी दाखवले त्यावेळी तिथे विषयाची बाटली आणि धांडे यांनी उलटी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी धांडे यांना उपचारासाठी हलवले. त्यांना हलवल्यानंतर स्वयंपाक घरात गेल्यावर गॅसची शेगडी आणि चाकूचे स्टॅन्ड दिसले. त्याच्या बाजूला डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर संगीता लाहोटी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांच्या छातीवर चाकूचा वार होता ,एका चाकूला मूठ नव्हती आणि कमरेमध्ये काळ्या रंगाचा चाकू दिसला. त्यासोबत दोन चाकू बाजूलाच वाकडे झालेले पडलेले होते . हे सर्व साहित्य फुलंब्रीकर यांना दाखविल्यानंतर त्यांनी हेच साहित्य असल्याचे सांगितले . सरकार पक्षाच्या वतीने तपासणी केल्यानंतर उलट तपासणी करताना एडवोकेट अनिरुद्ध घुले यांनी विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना विजय फुलंब्रीकर म्हणाली की, पंच म्हणून जाण्यासाठी तत्कालीन पालिकेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर यांनी लेखी पत्र दिले नव्हते, मृतदेहाच्या बाजूला रक्त किती पसरले होते? ते एक दीड फूट पसरले असल्याचे फुलंब्रीकर यांनी सांगितले. चाकूवर रक्त होते का? या प्रश्नाला उत्तर देताना फुलंब्रीकर म्हणाले की निरखून पाहिले नाही. त्यासोबत पोलिसांनी आणि हर्षवर्धन लाहोटी यांनी जेवढे दाखवले तेवढेच पाहिले वरच्या मजल्यावर जाऊन आपण पाहिले नसल्याचेही साक्षीदार विजय फुलंब्रीकर यांनी बचाव पक्षाला सांगितले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172