Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

७०वर्षांचीआई मुलाला वाचवण्यासाठी झाली फितूर तर ७ वर्षाचा मुलाने वडिलांच्या विरोधात दिली साक्ष -आरोपीला जन्मठेप

जालना- पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती बी. एस. गोरे यांनी दि.24 ऑगस्ट 2023 रोजी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीची 70 वर्षाची आई मुलाला वाचवण्यासाठी फितूर झाली आहे तर ज्या मुलाने वडिलांना आईवर वार करताना पाहिले त्या अज्ञान अल्पवयीन सात वर्षाच्या मुलाने वडिलांच्या विरोधात साक्ष दिली आहे.

जालना तालुक्यातील बोरखेडी येथील विठ्ठलराव बोरुडे हे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी दूध विक्रीचा व्यवसाय करून बस स्थानकात येऊन थांबले होते. त्याचवेळी त्यांचा भाचा शुभम बबन मिटकर यांनी बोरुडे यांना फोन करून तात्काळ सामान्य रुग्णालयात बोलावून घेतले. बोरुडे सामान्य रुग्णालयात आले त्यावेळी या प्रकरणातील तक्रारदार विठ्ठलराव बोरुडे यांची विवाहित मुलगी शोभा भरत भालेकर, राहणार हनुमान मंदिरामागे, मोरंडी मोहल्ला ,जुना जालना यांच्या अंगावर चाकूचे वार दिसले .तसेच एक चाकूही शरीरामध्ये दिसत होता. याप्रकरणी बोरुडे यांनी त्यांचे नातेवाईक राधाकिसन हरिभाऊ जोगदंड यांना या घटनेविषयी विचारणा केली असता जोगदंड यांनी शोभा आणि एकनाथ या पती-पत्नीमध्ये नेहमीच घरगुती कारणावरून वाद चालू असतात असे सांगितले. यातूनच भरत भालेकर यांनी वार केला असल्याची शक्यताही वर्तवली होती. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीवर दोषारोप पत्र ठेवून खटल्याची सुनावणी सुरू झाली. या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांचे साक्षीदार तपासण्यात आले. ज्यावेळी आरोपी भरत एकनाथ भालेकर याच्या 70 वर्षीय आईची साक्ष तपासण्यात आली त्या वेळी सुरुवातीला त्यांनी आपण घटनास्थळावर होतो असे सांगितले मात्र उलट तपासणी मध्ये त्या फितूर झाल्या आणि मुलाला वाचविण्यासाठी आपण घटनास्थळावर नव्हतो त्यामुळे या विषयीची काहीच माहिती नाही असे सांगितले. परंतु अतिरिक्त सरकारी अभियंता बी.बी. जाधव यांनी न्यायालयात साक्षी पुरावे सादर केले आणि ज्यावेळी ही घटना घडली होती त्या वेळचे छायाचित्र न्यायालयात सादर केले .ज्यामध्ये आरोपीची आई उपस्थित असल्याचे दिसत आहे .त्यामुळे न्यायालयाची देखील आई फितूर झाल्याची खात्री पटली. याच सोबत दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आरोपीचा सात वर्षांचा मुलगा. या मुलाने वडील एकनाथ भालेकर हे त्याच्या आईवर वार करत असताना पाहिले आणि तशीच साक्ष न्यायालयात दिली. तिसऱ्या महत्त्वाच्या पुराव्यामध्ये प्रेताची उत्तरिय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली .कारण याच डॉक्टरांनी मयत असलेल्या शोभा भरत भालेकर या विवाहितेच्या शरीरातून चाकू काढला होता. यासह अन्य काही महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायमूर्तींनी अतिरिक्त सरकारी अभियोग्यता बी.बी. जाधव यांनी सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून पत्नी शोभा यांचा खून करणाऱ्या पती भरत एकनाथ भालेकर वय तीस वर्ष ,राहणार हनुमान मंदिर मागे ,मोरंडी मोहल्ला जुना जालना याला खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही भारत भालेकर याला भोगावीलागणार आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button