Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

CM च्या जेवणाची निविदा निघाली ;राज्यमंत्री आठवले आज जालना

जालना-शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी अल्पपोहार व भोजन व्यवस्था व इतर बाबींचा पुरवठा करण्यासाठी अनुभवी व सुयोग्य अभिकर्त्याकडून विहित नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे मागविण्यात आलेली आहे. सदर ई- निविदा भरण्याचा कालावधी दि. 28.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत आहे. सदर ई-निविदा www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी ईच्छूक पुरवठादारांनी सदरची निविदा विहित कालावधीत भरण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगीता सानप यांनी  केले  आहे.

राज्यमंत्री आठवले   जालन्यात  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11.15 वा. औरंगाबाद येथून जालना येथील वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथे आगमन, सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, जालना, दुपारी 1.00 वा. सार्वजनिक बैठक, स्थळ- वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट, दुपारी 4. वृंदावन हॉल, हॉटेल गॅलेक्सी, जिंदल मार्केट येथून प्रयाण.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button