मराठा आरक्षण; पोलिसांचा अश्रुधुरांचामारा; आंदोलकांची दगडफेक आणि जाळपोळ; पत्रकारांनाही धक्काबुक्की
जालना- जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ,परंतु आंदोलक आपल्या मतावर ठाम असल्यामुळे काल दिनांक एक नोव्हेंबर रोजी प्रशासनाला पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन मागे घेण्यासाठी भाग पाडावे लागले.
या दरम्यान आंदोलकांवर लाठी चार्ज ही करावा लागला या लाठी चार्जला प्रतिउत्तर म्हणून अंध लोकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली या दोन्ही प्रकरणा नंतर आज दिनांक दोन रोजी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या महामार्गावर रास्ता रोको ही करण्यात आला बदनापूर येथे देखील संभाजीनगर कडे जाणाऱ्या आणि संभाजीनगर वर येणाऱ्या सर्व वाहनांची कोंडी करण्यात आली होती. जालना शहरात आज सकाळी 10:00 वाजल्यापासूनच अंबड चौफुली भागामध्ये तरुणांचा मोठा जमाव सुरू झाला आणि पाहता पाहता साडेअकरा वाजता सुमारास या जमावाने अंबड रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लावली या सर्व घटनेचे छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना जमावाने धक्काबुक्की करत तेथून काढून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुदुराचा मारा केला हा मारा होताच जमावाने देखील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आहे. हा सर्व प्रकार जसा आहे तसा आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा EDtv News चा हा प्रयत्न.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172