मी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलो आहे, माझ्यावर विश्वास ठेवा- नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

जालना- गेल्या तीन दिवसांपासून जालन्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील लाठी चार्ज , जाळपोळ रास्ता रोको या उद्रेकानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे अर्जित रजेवर गेले आहेत त्यामुळे त्यांचा कार्यभार आता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथील समादेशक शैलेश बलकवडे यांच्याकडे देण्यात आला आहे .
खरे तर शैलेश बलकवडे हे दोन दिवसांपासून बंदोबस्तासाठी जालना जिल्ह्यात आलेले आहेत ,आज सायंकाळी त्यांनी अधिकृत पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला .यावेळी त्यांनी अनावधानाने चुका झाल्या तर त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, परंतु जाणीवपूर्वक चूक केली तर मी कधीही सोडणार नाही, असा गर्भित इशारा देत असतानाच मी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलो आहे ,ती माझी जबाबदारी आहे .जाळपोळीच्या घटना होऊ नयेत, त्या थांबल्या पाहिजेत त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मदत करा असे, आवाहनही शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172