Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मंत्रालयातून कोणाचा फोन कोणाला आला? का झाला लाठीमार? सांगत आहेत आ.गोरंट्याल

जालना- मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. चार दिवसाच्या आंदोलनानंतर पाचव्या दिवशी या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला, गोळीबार केला .यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलकांवर मंत्रालयातून फोन आल्यानंतर लाठी हल्ला झाला अशी अफवा सुरू आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणीही कोणाचे नाव घेतले नाही किंवा या फोनची रेकॉर्डिंग ही बाहेर आलेली नाही .अशा परिस्थितीत आ. गोरंट्यालयांनी या फोनमुळेच लाठी हल्ला झाला आहे असा आरोप करून  आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही आज पत्रकार परिषद केली आहे.

दरम्यान कोणाचा फोन होता ?कोणाला आला या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मोघम उत्तर दिले आहे.  आठ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्यात “शासन आपल्या दारी “या कार्यक्रमानिमित्त येणार होते आणि त्यांच्या या कार्यक्रमात कोणाचे आंदोलन किंवा इतर काही विरोधी कामे नको म्हणून त्यांनी हे आंदोलन मोडण्यास भाग पाडल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button