Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

येत आहेत सळ्या उत्पादन करणारे दोन नवीन कारखाने; आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

जालना- जालना औद्योगिक वसाहतीमध्ये सळ्या उत्पादन करणारे दोन नवीन कारखाने येत आहेत या कारखान्यामुळे निश्चितच अनेकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे दरम्यान परिसरातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासंदर्भात काही आक्षेप आणि सूचना नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मे. पावन स्टिल टेक प्रायव्हेट लिमीटेड प्लॉट नं.डी-57,फेज-1,एमआयडीसी जालना आणि गट नं.66 गाव दरेगाव ता.जि.जालना या प्रस्तावित फेरो अलॉयज युनिट आणि प्रकल्पामध्ये 66,000 टन/वर्ष तयार करण्यासाठी फेरो अलॅाय, एसएएफ 2×18एमव्हीए आणि 2×60 मेट्रीक टन क्षमतेची प्रेरणा भट्टीस्थापित करुन 2000 टन प्रति/दिन बिलेटस, 1500 टन प्रति/दिन टीएमटी बार/राऊंड बार/वायर रॉडची रोलिंग मील आणि 500 टन प्रति/दिन स्ट्रिप एमएस शिटस/एमएसपाईप्स/एमएस फ्लॅट/एमएस अँगल्स/एमएस स्क्वेअर बार/एमएस चॅनल/एमएस बीम्स/एसएस प्लेटस प्रकल्पामध्ये एमएस बिलेटस 750 टीपीडी ते 2000 टीपीडी आणि टीएमटी बार 833.33 टीपीडी ते 2000 टीपीडीचे उत्पादन करण्याबाबत पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी दि.12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. तरी या प्रकल्पाबाबत सुचना किंवा आक्षेप असल्यास सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2 अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना येथे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


2)मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या प्रस्तावित विसतार प्रकल्पामध्ये टीएमटी बार 5000 टीएमटी ते 30,000 एमटीएम उत्पादन करणे व प्रसतावित नवीनएमएस बिलेटस 30,000 एमटीएम क्षमतेचे युनिट उभारणीबाबत पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी दि.21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. तरी या प्रकल्पाबाबत सुचना किंवा आक्षेप असल्यास सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2 अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना येथे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी केले आहे.मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या प्रस्तावित प्रकल्पामध्ये उत्पादन करणेबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button