Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

हवामान खातेच बंद करा- शेतकरी संघटना

जालना- जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची सध्या बिकट अवस्था झालेली आहे याला कारणीभूत म्हणजे हवामान खाते आहे कारण ज्यावेळी हवामान खाते अंदाज वर्तवितेत त्यानुसार शेतकरी पीक व्यवस्थापन करतो परंतु हवामान खाते चुकीचा अंदाज व्यक्त करत असल्यामुळे हे हवामान खातेच बंद करावे या आणि अन्य काही मागण्यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जालना तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या हडप या गावी हे उपोषण सुरू आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे, दत्तात्रय कदम यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू झाले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये मराठा मोर्चाला पाठिंबा म्हणून देखील या उपोषणाचा उद्देश आहे. यासोबत सन 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्या नुकसानी पोटी शासनाने जाहीर केलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे, पीक विमा अधिसूचना तात्काळ काढावी, ग्रामीण भागातील भार नियमन बंद करावे, या आणि अन्य काही मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये उपोषण करण्यामागे उद्देश सांगत असताना, या सर्व अडचणी या ग्रामीण भागातील जनतेच्या आहेत आणि प्रशासनाने तिथपर्यंत पोहोचून या अडचणी समजावून घ्याव्यात आणि त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी ही शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय कदम यांनी केली आहे.या वेळी मनोहर काळे, रामेश्वर गव्हाळे, अशोक आटोळे. आदि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button