मराठा आरक्षण गोळीबार चौकशी सुरू;अप्पर पोलीस महासंचालक सक्सेना जालन्यात; पाच जखमींची घेतली भेट
जालना -मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे .या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठी हल्ला आणि त्याच्या उत्तरा दाखल आंदोलकांनी केली दगडफेक यासंदर्भात नेमका काय प्रकार घडला याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते .
त्यानुसार या चौकशी समितीचे अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक श्री. सक्सेना हे आज जालन्यात आले होते .त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या तीन गावकऱ्यांची आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली .यामध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती नाईक आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल निमा घनघाव यांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी बोलताना श्री. सक्सेना म्हणाले की लवकरच ही चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करू. त्यांच्या या भेटीदरम्यान औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,जालनाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172