आपण यांना पाहिलंत का? वसतिगृहात राहणारी दोन मुले गायब
जालना- ग्रामीण भागातील दोन विद्यार्थी शिक्षणासाठी जालना शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहत होते .काल सायंकाळी चार वाजल्यापासून हे दोन्ही मुले गायब झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
आंबड रस्त्यावर माऊली नगर भागामध्ये चरणसिंग बाबूसिंग कचोर हे खाजगी वसतिगृह चालवतात. त्यांच्याकडे पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची राहण्याची ,जेवणाची व्यवस्था केलेली आहे . सध्या 40 विद्यार्थी इथे निवासासाठी आहेत .दरम्यान काल दिनांक सहा रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वैजनाथ बाबासाहेब घुले वय सोळा वर्षे ,राहणार घुले पाडळी तालुका घनसांवगी जिल्हा जालना आणि गजानन पुंजाराम मंडलिक वय सोळा वर्षे राहणार टेंभी आंतरवाली हे दोन्ही विद्यार्थी नेहमीप्रमाणे पार्थ कोचिंग क्लासेस मध्ये जात आहोत असे सांगून वसतिगृहातून निघाले ते सायंकाळी भोजनापर्यंत आलेच नाहीत. त्यामुळे भोजनाच्या वेळी या दोन विद्यार्थी गैरहजर दिसल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. हे विद्यार्थी क्लासलाही आले नसल्याचे तेथील शिक्षकांनी सांगितले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच अयोध्या नगर मध्ये हे क्लासेस आहेत . दोन्हीकडेही हे विद्यार्थी सापडले नाहीत. जून महिन्यापासून हे दोन्ही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी दाखल झाले होते .या प्रकरणी वसतिगृह चालक चरण सिंगकचोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील छायाचित्रातील विद्यार्थी कुठे आढळल्यास जालना तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Edtv jalna news App on play store, web-www.edtvjalna.com ,yt-edtvjalna