मराठा समाजाला आरक्षण,आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करा; वकिलाने ओतले अंगावर डिझेल
जालना- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे अनेक आंदोलन जखमी झाले आहेत .त्यामुळे पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज ऍड. मारुती भाऊसाहेब वाडेकर वय 34 ,राहणार मंगू जळगाव, तालुका घनसावंगी सध्या रहाणार यशोदीप नगर जालना, यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पोर्च समोर अंगावर डिझेल ओतून घेतले आणि तेवढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. अशा परिस्थितीत त्यांना तालुका पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई केली.
हे आत्मदहन करण्यासंदर्भात त्यांनी दिनांक सहा रोजी ायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते, आणि या निवेदनात वरील मागण्या केल्या होत्या. दरम्यान आज आंदोलन करत असताना तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील गांगे, गणेश नाईकवाडे, तसेच जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी सय्यद यांनी त्यांना पकडून तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे. मारुती वाडेकर हे आत्मदहन करत असताना त्यांच्यासोबत मनोज मरकड, आणि योगेश पवार यांचीही उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172