दिनविशेष; भारताच्या विश्वबंधुत्व दिवसाचे आणि अमेरिकेच्या 9/11 या इमर्जन्सी नंबर चे काय आहे कनेक्शन?
जालना -अमेरिका येथे भरलेल्या शिकागो परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाला आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी 130 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतामध्ये हा दिवस विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो ,आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांना उजाळा दिला जातो. अमेरिकेत सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला हा दिवस आणि या उलट 9/11 रोजीच अमेरिकेवर झालेला विमान हल्ला या दोन्ही परस्पर विरोधी घटना आहेत .परंतु चांगल्या घटनेची आठवण म्हणून अमेरिकेने 9/ 11 हा नंबर आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी नंबर म्हणून घोषित केला आहे. अशी माहिती कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे देवगिरी विभागाचे सह संपर्कप्रमुख हर्षवर्धन देशमुख यांनी जालन्यात दिली. विश्वबंधुत्व दिवसानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक सुनील रायठा शिवरतन मुंदडा डॉक्टर जुगल किशोर भाला यांची उपस्थिती होती. (सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा)
सुनील रायठा-दीडशे वर्षांपूर्वीची भारताची प्रतिमा बदलण्याचा आणि भारताची आध्यात्मिक शक्ती दाखवण्याचे काम स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी केले आहे. आज त्यांनी जे विचार मांडले त्या दिशेने आपण जात आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज जी- 20 मुळे भारताची ताकद वाढली आहे आणि भारत हा विश्वाचा बंधू म्हणजेच ,विश्वबंधुत्व सांभाळत महाशक्तीच्या रूपाने पुढे येत आहे. असे मत उद्योजक सुनील राठोड यांनी व्यक्त केले.
शिवरतन मुंदडा– सनातन धर्मामध्ये जात महत्त्वाची नाही तर कर्म महत्त्वाचे आहे असा महत्त्वाचा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला आहे .आपल्या डोक्यात जात हा शब्द भरला गेला आणि त्यावेळेस पासूनच जात व्यवस्था निर्माण झाली. खरंतर वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना स्वामी विवेकानंदांनी मांडली आणि तीच संकल्पना आता जी- 20 या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत देश पुढे नेत आहे आणि विश्वबंधुत्व खऱ्या अर्थाने निर्माण करत आहे. असे मत उद्योजक शिवरतन मुंदडा यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद केंद्राचे देवगिरी विभाग प्रमुख कुलदीप महाजन यांनी केले, याचा उद्देश जगदीश दायमा यांनी मांडला ,तर सूत्रसंचालन जालन्याचे केंद्रप्रमुख तर रोहित अग्रवाल यांनी केले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172